Header AD

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या पाठपुरवठ्याने प्रदीर्घ काळ प्रलंबीत कोपरीपूल येथील नाल्याच्या कामाला सुरवातठाणे  |  प्रतिनिधी  :  गेले १५ वर्षे नौपाडा भास्कर कॉलनी येथील पावसाळ्यात येणाऱ्या पुरग्रस्त स्थितीतून लवकरच येथील नागरिकांची सुटका होणार आहे.चिखलवाडी, तबेला, पंपींग स्टेशन, भास्कर कॉलनीचा भाग हा कायम पावसाळ्यात पाण्याखाली असतो. छातीभर पाण्यात गेले १५ वर्षे येथील ३००-४०० कुटुंबे पावसाळ्यात आपले हालाखीचे जीवन जगत आहेत. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून व बाधित नागरिकांना घेऊन  स्थानिक नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी व समाजसेक डॉ.राजेश मढवी यांच्या वतीने प्रशासनाचा दरवाजा ठोठावण्यात आला. 


प्रशासनाने याची त्वरित दखल घेत या अतिवृष्टीमुळे जमणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन नाल्याचे काम सद्यस्थितीत सुरू केले आहे. त्यासाठी  एम.एम.आर.डी.ए. (MMRDA) चे अभियंता विनय सुर्वे यांना घेऊन सदर कामाची पाहणी केली हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी आम्हाला दिली. याबाबत  प्रशासन , एम.एम.आर.डी.ए. (MMRDA) डॉ.राजेश मढवी  व नगरसेविका सौ.प्रतिभा रा. मढवी यांसकडून तसेच येथील नागरिकांतर्फे शतशः आभार व्यक्त करण्यात आले आहेत.नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या पाठपुरवठ्याने प्रदीर्घ काळ प्रलंबीत कोपरीपूल येथील नाल्याच्या कामाला सुरवात नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या पाठपुरवठ्याने प्रदीर्घ काळ प्रलंबीत कोपरीपूल येथील नाल्याच्या कामाला सुरवात Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads