आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहि केचे लोकार्पण
ठाणे | प्रतिनिधी : - आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन श्री कैलास पवार यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देऊन करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाला रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.
आजच्या या कोरोना आजाराच्या बिकट परिस्थितीत पेशंटला रुग्णवाहिका मिळणे कठीण जात आहे, अशा वेळी ही रुग्णवाहिका नागरिकांकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाला देताना मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना आ. केळकर यांनी बोलताना व्यक्त केली तर सिव्हिल सर्जन श्री. पवार यांनी आ. केळकर यांचे आभार व्यक्त केले.
या लोकार्पण कार्यक्रमास भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिव्हिल सर्जन कैलास पवार, नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका सौ. नम्रता कोळी, सिव्हिल सर्जन कैलास पवार, राजेश गाडे, निलेश कोळी, विशाल वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते. हा लोकार्पणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे पार पडला.
आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहि केचे लोकार्पण
Reviewed by News1 Marathi
on
October 08, 2020
Rating:

Post a Comment