Header AD

महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी, वंजारपट्टि नाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न अब्दुल कलाम यांचे नावे नामकरण
भिवंडी  | प्रतिनिधी  :  महानगरपालिकेत आज भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी  पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे, नगरसेवक मालिक मोमीन, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्यालय उपायुक्त डॉक्टर दीपक सावंत शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, बांधकाम लेखापरीक्षक काशिनाथ तायडे , मुख्य लेखापरीक्षक श्रीकांत अनारसे, कर मूल्यांकन विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग समिती क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त दिलीप खाने, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले इत्यादी उपस्थित होते.या मुख्य कार्यक्रमानंतर वंजार पट्टि नाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नामफलक अनावरण समारंभ महापौर विलास प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी देखील पालिका आयुक्त डॉक्टर फक्त विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे, नगरसेवक मलिक मोमीन अतिरिक्त आयुक्त प्रकाश दिवटे, मुख्यालयाचे उपायुक्त दीपक सावंत, अभियंता लक्ष्मण गायकवाड, उपायुक्त मारुती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी, वंजारपट्टि नाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न अब्दुल कलाम यांचे नावे नामकरण महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी, वंजारपट्टि नाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न अब्दुल कलाम यांचे नावे नामकरण Reviewed by News1 Marathi on October 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads