Header AD

डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात वृद्धी
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२० : अमेरिकी डॉलरचे मूल्य कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरांना मागील व्यापारी सत्रात आधार मिळाला. अतिरिक्त मदतीच्या अतिरिक्त चिंतेने गुंतवणूदार सोन्याकडे आकर्षित झाले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कोव्हिड-१९ च्या दुस-या लाटेच्या चिंतेत वाढ झाल्याने सोने ०.२७% नी वधारले व १९०६.८ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. तसेच कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे पिवळ्या धातूला आणखी आधार मिळाला.


कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्यावर नकारात्मक परिणाम झाला व ते सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळाले.


अमेरिकेकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याचे स्पष्ट चिन्ह दिसत नसल्यामुळे पिवळ्या धातूतील नफा मर्यादित राहिला. तरीही व्हाइट हाऊसच्या अधिका-यांशी याबाबतीत चर्चेबाबत हाऊस स्पीकर नँसी पेलोसी आशावादी आहेत. नोव्हेंबर २०२० पूर्वीच्या निवडणुकीपूर्वी ही मदत मिळेल, अशी आशा आहे. तरीही या मदतीच्या अनिश्चिततेमुळे डॉलरला आधार मिळाला. परिणामी सोन्याचे दर घसरू शकतात. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर कमी होऊ शकतात.


डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात वृद्धी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात वृद्धी Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads