Header AD

खड्यांच्या अपघाताने कल्याण डोंबिवलीत नागरिक जखमी केडीएमसी परिवहन चालकाच्या पायाला दुखापत
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली परिसरात खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून या खड्ड्यामध्ये पडून नागरिक जखमी होणाच्या घटना देखील वाढल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात असलेल्या खड्ड्यात पडल्याने  केडीएमसी परिवहनचे चालक अवतार सिंह हे जखमी झाले असून त्यांच्या गुडघ्याला मार लागला आहे. गुरवारी दुपारी अडीचच्या सुमारास अवतार सिंह हे आपल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी सहजानंद चौक येथील खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळल्याने तोल जाऊन ते खाली पडले. खाली पडल्याने त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नाही. पायावरील उपचारासाठी ते रुक्मिणीबाई रुग्णालयात आले असता त्यांचा एक्सरे काढण्यात आला व अस्थीतज्ञ नसल्याने उद्या येण्यास सांगितले.


गुरवारी संध्याकाळी डोंबिवली एमआयडीसी परिसरात उस्मा पेट्रोल पंपानजीक आजदे गावात राहणारी एक महिला दुचाकीवरून जात होती. यावेळी गाडी खड्ड्यात आदळल्याने अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेंडकर यांचा देखील डोंबिवलीमध्ये दुचाकीवरून जाताना खड्ड्यामुळे अपघात झाला असून त्यांच्या पायाला सात टाके पडले आहेत. तर एका खाजगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रथमेश वाघमारे यांचा देखील ९० फुटी रस्त्यात खड्ड्यात पडून अपघात झाला असून यात त्यांना किरकोळ लागले असले तरी मात्र दुचाकीचे नुकसान झाले आहे.


या सर्व घटना पाहता केडीएमसी प्रशासनाने आता तरी  महानगरपालिका क्षेत्रातील खड्ड्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत असून केडीएमसी प्रशासन आता तरी या खड्ड्याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान खड्ड्यामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी महापौर खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत असलेला विडंबनात्मक फोटो सोशल मिडीयावर वायरल केला आहे. 

खड्यांच्या अपघाताने कल्याण डोंबिवलीत नागरिक जखमी केडीएमसी परिवहन चालकाच्या पायाला दुखापत खड्यांच्या अपघाताने कल्याण डोंबिवलीत नागरिक जखमी  केडीएमसी परिवहन चालकाच्या पायाला दुखापत Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads