Header AD

कल्याण डोंबिवलीतील मंदिरे खुली करावी यासाठी भाजपचे उद्या उपोषण
डोंबिवली  |  शंकर जाधव  :  पालिका हद्दीतील बंद मंदिरे भाविकांसाठी खुले करण्यात यावी अशी  मागणी करत भाजप उद्या सकाळी १० वाजता डोंबिवलीकरांचे  आराध्यदैवत गणपती मंदिर ,देवस्थाना समोर उपोषणास बसणार आहेत.यावेळी भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम शहरातील  कार्यकर्ते,  मंडल  पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा आघाडी ,उत्तरभारतीय आघाडी,गुजराथी प्रकोष्ठ, सोशल मीडिया पदाधिकारी तसेच भाजप नगरसेवक उपोषणास बसणार असल्याचे डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी आणि सरचिटणीस समीर चिटणीस यांनी सांगितले.नुकतेच माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी  मुंबईत भाजपच्या एका कार्यक्रमात राज्य सरकार मंदिराची दारे बंद ठेवत असून मदिरा जनतेला मिळावी म्हणून परवानगी देतात, आणि त्यांनाआम्ही जाबही विचारायचा नाही ? असे सांगितले होते.
कल्याण डोंबिवलीतील मंदिरे खुली करावी यासाठी भाजपचे उद्या उपोषण  कल्याण डोंबिवलीतील मंदिरे खुली करावी यासाठी भाजपचे  उद्या उपोषण Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads