Header AD

मंदिरे सुरू करण्यासाठी चिपळूण भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला निवेदन
चिपळून | प्रतिनिधी  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. अनलॉक मध्ये टप्प्याटप्प्याने उद्योग क्षेत्रासह काही आस्थापने सुरू करण्यात आली. मात्र अजूनही महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यात आलेली नाहीत. महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्याकरता गेल्या महिनाभरापूर्वी भाजपच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप मंदिरे खुली केली नाहीत.  ही मंदिरे सुरु करण्यात यावीत, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपच्या वतीने मंगळवारी आंदोलने करीत निवेदने देण्यात आली. या पार्श्वभूमीवर चिपळूण भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर व अध्यात्मिक समन्वय चिपळूण तालुका संयोजक ह.भ.प. प्रकाश तांबिटकर यांच्या शिष्टमंडळाने येथील तहसीलदार कार्यालयातील केवल महाकाल यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारसाठी निवेदन सादर करण्यात आले. 


कोरोना परिस्थितीमुळे गेली काही महिने लॉकडाऊन नंतर अनलॉक लागू करण्यात आले. टप्प्या-टप्प्याने अर्थव्यवस्था सुरळीत आणण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्रासह काही आस्थापने हळूहळू सुरू करण्यात आली. यामध्ये विदेशी दारूच्या दुकानांसह आता बार, रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यात आली आहेत.  मात्र, मंदिरे अद्याप भाविकांसाठी खुली करण्यात आलेले नाहीत.  ही मंदिरे सुरु करण्यात यावीत.  यासाठी भाजपच्यावतीने मंगळवारी आंदोलने करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.या पार्श्वभूमीवर चिपळुन भाजपच्यावतीने मंदिरे सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारसाठी निवेदन सादर करण्यात आले. 


यानुसार मंदिरे बंद असल्यामुळे अनेक धार्मिक सण साजरे होत नाहीत. त्यामुळे भाविकांची मने दुखावली गेली आहेत. शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या नवरात्रोत्सव काळात मंदिरामध्ये नऊ दिवस अनेक धार्मिक विधी होत असतात. परंतु राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मंदिरे बंद अवस्थेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वयच्या वतीने मागणी करण्यात येत आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, ह-भ-प मधुकर फके, संदीप सुखदरे, अमित ओतारी, जतीन घटे, गजानन घेवडेकर, ओंकार बापट, दीपक चव्हाण, समीर राऊत, सुयश पेठकर, सुधीर सुतार, संदीप पांचाळ, अमेय सुर्वे शार्दूल साडविलकर, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.

मंदिरे सुरू करण्यासाठी चिपळूण भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला निवेदन मंदिरे सुरू करण्यासाठी चिपळूण भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला निवेदन Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads