Header AD

महाराष्ट्रातील पहिले पोस्ट कोविड सेंटर कल्याणमध्ये सुरु

 कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कोरोनातून बरं झाल्यानंतर रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या पोस्ट कोवीड रिहॅबिलिटेशन सेंटर'चे उद्घाटन कल्याणमध्ये करण्यात आले. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मातोश्री शामुबाई लोहाणा समाज सभागृहात हे सेंटर आजपासून सुरू करण्यात आले.


कोवीडमधून बरे झाल्यानंतर अनेकांमध्ये वेगवेगळ्या शारिरीक समस्या उद्भवतात. मग त्या श्वसनाशी संबंधित (फायब्रोसिस) असो, शरिराच्या हात-पाय यांसारख्या अवयवांच्या वापराबाबत असो की इतर काही. त्यामुळे कोवीडमधून रुग्णाची सुटका होते. मात्र इतर शारिरीक त्रास त्याला होऊ लागतात. अशा रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता 'पोस्ट कोवीड रिहॅबिलिटेशन सेंटर ची नितांत आवश्यकता भासत होती. त्यानूसार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आयएमएच्या माध्यमातून या पोस्ट कोवीड सेंटरला मूर्त स्वरूप दिलं.
कोवीडमधून बरे झालेले पेशंट नंतर गंभीर झाल्याचीही उदाहरणे अनेक आहेत. अद्याप कोवीडचं संकट गेलेलं हे संकट जाईपर्यंत आपण मास्कसह इतर आवश्यक काळजी घेणे बंधनकारक असल्याचा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी दिला. आपण कोवीडमधून बरे झालो असलो तरी पूर्णपणे बरे झालेलो नाही. त्यासाठी आवश्यक ती लंग्ज फिजिओथेरपी सर्वात महत्वाची असून आपण ती घरी करत असतो. कल्याणातील हे पहिले पोस्ट कोवीड केअर सेंटर अशा रुग्णांना नक्कीच फायदेशीर ठरेल असे सांगत शिंदे यांनी केडीएमसी आणि कल्याण आयएमएचे कौतुक केले.


दररोज दुपारी ४ ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत हे पोस्ट कोबीड रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू राहणार असून त्यामध्ये डॉ. मनिषा लाल,  डॉ.मनाली जैन, डॉ. रितू विश्वास, डॉ. हेतल शहा आणि डॉ. दर्शना पालाडे या ५ फिजिओथेरपीस्ट उपचार करणार असल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.या उद्घाटन सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, सभागृहनेते प्रकाश पेणकर, नगरसेवक सचिन बासरे, श्रेयस समेळ, दिपेश म्हात्रे, कल्याण आयएनएचे डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. ईशा पानसरे, विमल ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रातील पहिले पोस्ट कोविड सेंटर कल्याणमध्ये सुरु महाराष्ट्रातील पहिले पोस्ट कोविड सेंटर कल्याणमध्ये सुरु Reviewed by News1 Marathi on October 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads