महापुरूषांच्या पुतळ्यांच्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची भाजपाची मागणी
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध चौकात महापुरुषांचे पुतळे असून या पुतळ्यांची विटंबना होऊ नये यासाठी सुरक्षेसाठी महापुरूषांच्या पुतळ्यांच्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भाजपाच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सध्या रस्त्यांवर नागरीकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम महानगरपालिकेतर्फे चालू आहे. देशसेवा व देशकार्यासाठि आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणार्या महापूरूषांचे सतत आपल्याला स्मरण व्हावे या हेतूने संपूर्ण देशाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपीता म.गांधी, स्वातंत्रविर सावरकर, लोकमान्य टिळक, दिनदयाल उपाध्याय, हिंदूह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अश्या महापूरूषांचे पुतळे केडीएमसी हद्दीमध्ये येणार्या चौकाचौकात स्थापीत केले आहेत.
या पुतळ्यांची कोणी विटंबना करू नये म्हणून त्यांच्या सुरक्षिततेच्या हेतूने सुध्दा प्रत्येक चौकात सीसीटीव्ही लावण्यात यावे. जेणे करून कोणी विक्षिप्त वाईट प्रव्रुत्ति या महापूरूषांच्या पुतळ्यांची विटंबणा करण्याचा विचार सुध्दा मनात अणू शकणार नाहि. तसेच अशा संभावित अप्रिय घटना टळून शहरांतिल शांतिचा भंग होणार नाही. यासाठी या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन या महापूरूषांच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव, भाजपा कार्यकर्ता भरत पाटिल, कल्याण जिल्हा महिला सचिव उषा दिसले, कल्याण जिल्हा कार्यकारीणी महिला सदस्या सुनुता भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment