फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये बांदोडकर महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी कॅडेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यानी COVID 19 या जागतिक महा भयंकर संकटात आपले शारीरिक व मानसिक आरोग्य समतोल राखण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढवून या संकटाशी दोन हात करण्यासाठी योग, कसरती, व्यायाम, धावणे, चालणे, एका मिनिटात 67 push ups, रोज 7 कि.मी. रन ईत्यादी आव्हान उभे करून, रन फॉर फ्रीडम हे अभियान गांधी जयंती म्हणजे 2nd ऑक्टोबर, रोजी बरोबर एक महिन्यासाठी घेतलेल्या या आव्हानाचा समारोप झाला, परंतु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कॅप्टन,मोझेस कोलेट व असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट बिपीन धुमाळे यांनी हे अभियान कोठेही न थांबता अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
ठाण्यात जवळच्या परिसरात सर्व योग्य ती खबरदारी घेऊन 52 विद्यार्थ्यानी रन व cycling करून नागरिकांनी भीती न बाळगता व्यायामाची कास धरावी व या महामारीचा सामना करावा यासाठी जागरूकता निर्माण केली. राष्ट्रीय छात्र सेनेचा हा एक वेगळा संकल्प होता,
1MAH. BN NCC MUMBAI B GROUP यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.
बांदोडकर महाविद्यालयात ASC Thane Ncc unit हे नेहमीच 1 महाराष्ट्र बटालियनचे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात, नुकत्याच पार पडलेल्या महा रक्तदान शिबीर, पावसाळ्यात वृक्षारोपण, e कचरा व्यवस्थापन, एक गाव दत्तक योजना, ईत्यादी काही महत्त्वाचे उपक्रम या महाविद्यालयात होत आहेत,

Post a Comment