Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार पार ३०९ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


एकूण  ४३,११५ रुग्ण तर ८३८ जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत २९६ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार पार गेली असून आज नव्या ३०९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या ३०९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४३,११५ झाली आहे. यामध्ये ३८५९ रुग्ण उपचार घेत असून ३८,४१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५९कल्याण प  ११८डोंबिवली पूर्व ८५डोंबिवली प- ३१मांडा टिटवाळा  तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार पार ३०९ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार पार  ३०९ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads