Header AD

ओकिनावाकडून कनेक्‍टेड स्‍कूटर्स रेंजसाठी इको अॅप सादर
मुंबई  :  ओकिनावा या आघाडीच्‍या 'मेक इन इंडिया' इलेक्ट्रिक दुचाकी उत्‍पादक कंपनीने ब्रॅण्‍डच्‍या आयप्रेज व रिज ई-स्‍कूटर रेंजमधील नवीन 'इंटेलिजण्‍ट स्‍कूटर'साठी 'इको अॅप' हे मोबाइल अॅप सादर केले आहे. हे मोबाइल अॅप्‍लीकेशन सध्‍या आयप्रेज+ व रिज+ ई-स्‍कूटर्ससाठी असणार आहे. हे अॅप्‍लीकेशन अँड्रॉईड व आयओएस व्‍हर्जन्‍सवर उपलब्‍ध आहे.या अॅपमध्‍ये युजर्सना सुधारित, तंत्रज्ञान सक्षम अनुभव देण्‍यासाठी अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. हे अॅप्‍लीकेशन ग्राहकाला मॅपवर स्‍कूटरचे लोकेशन पाहण्‍यासाठी गुगल मॅप्‍सचा रोड व सॅटेलाइट व्‍ह्यूमध्‍ये वापर करण्‍याची सुविधा देते. ज्‍यामुळे 'फाइण्‍ड माय स्‍कूटर' वैशिष्‍ट्य कार्यरत केले असता ते फोनच्‍या लोकेशनपासून स्‍कूटरच्‍या लोकेशनपर्यंत दिशा दाखवते.


''ओकिनावामध्‍ये आम्‍ही नेहमीच नाविन्‍यता आणण्‍याचा आणि तंत्रज्ञानाच्‍या संदर्भात सर्वोत्तम सुविधा देण्‍याचा निरंतरपणे काम करत आहोत. नवीन इको मोबाइल अॅप्‍लीकेशन हा सोयीसुविधांसदर्भात आज तंत्रज्ञानाने आयसीई काउंटरपार्ट्सनुसार कशाप्रकारे ईव्‍हीला प्राधान्‍य दिले आहे हे दाखवण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. इको अॅपसह आमचे ग्राहक दर्जात्‍मक उत्‍पादने व अनुभवांचा आनंद घेऊ शकतील, ज्‍यामधून ईव्‍हींची कार्यक्षमता दिसून येईल,'' असे ओकिनावाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व संस्‍थापक जीतेंदर शर्मा म्‍हणाले.

या अॅपमधील तंत्रज्ञान वाहनाच्‍या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री देते. इको अॅपसह एका क्लिकमध्‍ये चोरी होण्‍याच्‍या केससंदर्भात स्‍कूटर जागेवरच अचल करता येते. आजच्‍या युगात अनेकवेळा असे घडते की गाडी पार्क केलेल्‍या ठिकाणी इतर लोक अधिकार नसताना देखील तेथून दुस-या ठिकाणी हलवण्‍याचा प्रयत्‍न करतात. 'सेक्‍युअर पार्क' हे अॅपमधील रोचक वैशिष्‍ट्य आहे. हे वैशिष्‍ट्य वाहन मालकांना त्‍यांच्‍या ई-स्‍कूटरच्या अनधिकृत हालचालीवर देखरेख ठेवण्‍यामध्‍ये मदत करते. हे अॅप वाहनाचे संरक्षण करण्‍यासोबत युजरसाठी उपयुक्‍त देखील आहे. या अॅपमध्‍ये 'एसओएस मॅसेजिंग' वैशिष्‍ट्य आहे, जे कार्यान्वित केले असता त्‍वरित युजर्सच्‍या इमर्जन्‍सी संपर्क क्रमांकांवर वेळ व लोकेशनसह संदेश पाठवते.सुलभ राइडसाठी युजरला वाहनाच्‍या स्थितीबा‍बत माहिती असणे आवश्‍यक आहे. या मोबाइल अॅप्‍लीकेशनसह युजर सुलभपणे स्‍पीडिंग, टोईंग, कर्फ्यू किंवा बॅटरी कमी झाल्‍यासंदर्भात अलर्ट्स ठेवू शकतो. त्रासमुक्‍त राइडसाठी युजर या अॅपच्‍या माध्‍यमातून वाहनाच्‍या स्थितीची माहिती घेऊ शकतो. या अॅपमध्‍ये 'जिओफेन्‍स' वैशिष्‍ट्य देखील आहे, जे युजरला जिओ-फेन्‍स मर्यादेमध्‍ये वाहन प्रवेश केल्‍यास किंवा बाहेर गेल्‍यास अॅपच्‍या माध्‍यमातून माहिती देते. अॅप्‍लीकेशनवरील ड्रायव्‍हर स्‍कोअर वैशिष्‍ट्य युजरच्‍या स्‍पीडिंग, हार्ड ब्रेकिंग, अयोग्‍यरित्‍या अॅक्‍सलरेशन व वळण अशा ड्रायव्हिंग पद्धतींबाबत माहिती देते.ओकिनावाने नवीन इको अॅपसह कनेक्‍टेड वेईकल्‍स विभागामध्‍ये प्रवेश केला आहे. या नवीन ऑफरिंगसह ब्रॅण्‍डचा ग्राहकांना अस्‍सल इलेक्ट्रिफाईंग राइड अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे.  

ओकिनावाकडून कनेक्‍टेड स्‍कूटर्स रेंजसाठी इको अॅप सादर ओकिनावाकडून कनेक्‍टेड स्‍कूटर्स रेंजसाठी इको अॅप सादर Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads