Header AD

गाडीत पेट्रोल भरले की, पाणी असे विचारताच तरुणांचे हात पाय केले फॅक्चर पेट्रोल पंपावरील कामगारांची गुंडगिरी


गाडीत पेट्रोल टाकले तर पाणी कसे काय निघते. फक्त इतकेच विचारल्याने दोन तरुणांना पेट्रोल पंपावरील कर्मचा:यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचा:यांच्या गुंडगिरीने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करुन पुढील तपास पोलिस करीत आहेत....


विओ  | कुणाल  म्हात्रे  : कल्या़ण पूव्रेत राहणारा मोहम्मद सहीम आणि त्याचा मित्र शुभम  सिंग काही कामानिमित्त डोंबिवलीला गेले होते. येताना त्यांच्या गाडीतील दुचाकीमधील पेट्रोल कमी असल्याने त्यांनी गाडी डोंबिवलीतील उस्मा पेट्रोल पंपावर घेतली. गाडीत पेट्रोल टाकले गेले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीमध्ये बिघाड झाला. मोहम्मद सहीम हा गॅरेजमध्ये काम करतो.


त्यामुळे त्याच्या लक्षात आले कीगाडीत काही बिघाड झाला आहे. त्याने गाडीतील पेट्रोल चेक केले. त्याठिकाणी गाडीतून पेट्रोल ऐवजी पाणी बाहेर आले. त्वरीत त्यांनी पुन्हा पेट्रोल पंपावर जाऊन विचारणा केली कीगाडीत पेट्रोल भरले होते. तर त्यातून पाणी कसे येत आहे. पेट्रोल कुठे गेले. अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग पंपावरील कर्मचारी विरेंद्र सिंगविक्रांत सिंग आणि गोविंद कुमार आणि अभय काटवटे या चार जणांनी मोहम्मद सहीव व शुभम सिंगला बेदम मारहाण केली.


या मारहामीत दोघांचे हात पाय फॅक्चर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील चारही जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे मानपाडय़ाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादाहरी चौरे यांनी सांगितले.

गाडीत पेट्रोल भरले की, पाणी असे विचारताच तरुणांचे हात पाय केले फॅक्चर पेट्रोल पंपावरील कामगारांची गुंडगिरी गाडीत पेट्रोल भरले की, पाणी असे विचारताच तरुणांचे  हात पाय केले फॅक्चर पेट्रोल पंपावरील कामगारांची गुंडगिरी Reviewed by News1 Marathi on October 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads