Header AD

शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक डॉ. जे पी शुक्ला


पिसवली मध्ये मुली जन्माचे स्वागत करून आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  सध्या घडणाऱ्या घटना आणि परिस्थिती पाहता शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक असल्याचे मत साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज एंड नित्यानंद हॉस्पिटल कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ. जे पी शुक्ला यांनी व्यक्त केले. कल्याण पूर्वेतील पिसवली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ते बोलत होते.


रविवारी आंतरराष्ट्रीय बालिका दिना निमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण मार्फत बेटी बचाव बेटी पढाव ह्या उपक्रम अंतर्गत मुली जन्माचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत त्रिशा महेश जाधव, तमन्ना बंटी जयस्वाल, पिंकी हरेंद्र जयस्वाल या तीन नवजात मुलींच्या पालकांना मिठाईकपडेमच्छरांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी देण्यात आली. तर इतर पालकांच्या घरी जाऊन मुली जन्माचे स्वागत करण्यात आले.
गेली दोन वर्षे हया उपक्रमा करीता ब्रँड अँम्बॅसॅडर म्हणून काम करणारे डॉ. जे.पी.शुक्ला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाचे कौतुक केले. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आणि घडलेल्या घटना पाहता मुलींना केवळ शालेय शिक्षण देणे गरजेचे नसून शालेय शिक्षणासोबतच स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुली स्वताची सुरक्षा स्वतः करू शकतील एवढं स्वावलंबी बनविलं पाहिजे. यापुढे दिल्लीतील निर्भया असो किंवा उत्तर प्रदेश मधील हाथरस सारख्या घटना घडता कामा नये. यासाठी मुलींच्या हातात स्वरक्षणाचे शस्त्र असले पाहिजे असे मत डॉ. शुक्ला यांनी व्यक्त केले.      


यावेळी प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे, अंगणवाडी सेविका सुर्यवंशीसिन्नरकर, वंदना पाटीलमदतनिस महाले तसेच अविनाश देव्हाडे उपस्थित होते.

शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक डॉ. जे पी शुक्ला शालेय शिक्षणासोबतच मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे आवश्यक डॉ. जे पी शुक्ला Reviewed by News1 Marathi on October 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads