Header AD

कोवीड रुग्णालय दर्जा असणाऱ्या रूग्णालयात जनरेटर, इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
कल्याण   |  कुणाल  म्हात्रे   :  क.डो.म पा परिसरात विजेच्या लपंडावाच्या घटना घडतात. कोरोना पार्श्वभूमीवर कोवीड रूग्णालयात कोरोना रूगणावर उपचार सुरू असताना   रुग्णाची  ऑक्सिजन पुरवठा अभावी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.  त्यामुळे अशा रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर/ इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यामुळे विघुत पुरवठा ठप्प बंद झाल्यास रूग्णांना देण्यात येणाऱ्या आँक्सिजन सुविधा सुरळीत राहणार आहे.     सोमवारी सकाळी बिघाडामुळे  सर्वत्र विद्युत पुरवठा बंद पडला होता. महापालिका परिसरात बरेच वेळा विद्युत पुरवठा बंद पडण्याचा घटना घडतात. सध्याच्या परिस्थितीत महापालिकेने अनेक रुग्णालयांना  कोविड रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे. या रुग्णालयातील   विद्यूत  पूरवठा अचानक बंद पडल्यास  सदर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची ऑक्सिजन पुरवठा अभावी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर/ इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.
कोवीड रुग्णालय दर्जा असणाऱ्या रूग्णालयात जनरेटर, इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश कोवीड रुग्णालय दर्जा असणाऱ्या रूग्णालयात  जनरेटर, इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश     Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads