Header AD

भाजपा महिला अध्यक्षपदी मृणाल पेंडसे,युवा मोर्चाची धुरा सारंग मेढेकरांकडे


■आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडून घोषणा..


ठाणे  | प्रतिनिधी  : भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नगरसेविका मृणाल पेंडसे यांची, तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी सारंग मेढेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध मोर्चा व सेल/प्रकोष्ठ अध्यक्ष आणि शहर कार्यकारिणीत आणखी उपाध्यक्ष व चिटणीसांचा समावेश करण्यात आला आहे.


विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकान्वये दिली. तर भाजपा कार्यकारिणी व नव्या मोर्चांच्या अध्यक्षांकडून भाजपाची संघटना आणखी बळकट होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे.


महिला मोर्चा अध्यक्षपदी नगरसेविका मृणाल पेंडसे, युवा मोर्चा अध्यक्षपदी सारंग मेढेकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी वीरसिंग परछा, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी संजय रमेश चौधरी आणि अल्पसंख्य मोर्चा अध्यक्षपदी अरिफ बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेल/प्रकोष्ठ संयोजकांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. अॅड. मकरंद अभ्यंकर (कायदा), परीक्षित धुमे (प्रज्ञा), सुकुमार शेट्टी (दक्षिण भारतीय), शिशिर जोग (उद्योग), मितेश शहा (व्यापारी), संदीप काळेकर (शिक्षक), अमरीश ठाणेकर (मच्छीमार), गीत नाईक (आध्यात्मिक), अनिल भदे (ज्येष्ठ कार्यकर्ता), बाळा केंद्रे (भटके विमुक्त). सीए विनोद टीकमानी (आर्थिक), प्रशांत तळवडेकर (कामगार), शैलेश मिश्रा (उत्तर भारतीय), कॅप्टन चंद्रशेखर वर्हाळकर (माजी सैनिक), अॅड. अल्केश कदम (सहकार), आनंद बनकर (दिव्यांग), डॉ. महेश जोशी (वैद्यकिय), स्वप्नील आंब्रे (सोशल मिडिया) यांची नियुक्ती झाली आहे.


जिल्हा उपाध्यक्षपदी समिरा भारती, सागर भदे (मिडिया), डॉ. राजेश मढवी. हरी मेजार, संजय पाटील, जनार्दन खेतले, निलेश बाळाराम पाटील, अंकुश पाटील, विक्रम भोईर, प्रदिप जंगम यांची, तर चिटणीसपदी सुभाष साबळे, प्रविण रानडे, किशोर गुणीजन, राजकुमार यादव, आशिष राऊत, निलेश दिनेश पाटील, दत्ता घाडगे, समीर भोईर, अमोल फडके (प्रशिक्षण), श्यामकांत एकनाथ अणेराव, निता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.


भाजपा महिला अध्यक्षपदी मृणाल पेंडसे,युवा मोर्चाची धुरा सारंग मेढेकरांकडे भाजपा महिला अध्यक्षपदी मृणाल पेंडसे,युवा मोर्चाची धुरा सारंग मेढेकरांकडे Reviewed by News1 Marathi on October 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads