आता ठाण्याची मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये खाता येणार
ठाणे | प्रतिनिधी : राज्य शासनाने हॉटेल्स सुरु करण्याचे धोरण आखले आहे. त्याानुसार ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे हॉटेल आता खवय्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाायझेशन आणि ग्राहकांच्या नोंदी ठेवून दर्दी खवय्यांसाठी हे हॉटेल सुरु करण्यात आले असल्याचे हॉटेलचे चालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांनी दिली.
तिखट, झणझणीत मिसळ खाण्यासाठी सबंध जिल्ह्याभरातील दर्दी खवय्ये या तहसील कार्यालयााबाहेरील कॅण्टीनमध्ये येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने हे हॉटेल बंद होते. तर, गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये मिसळ पार्सल स्वरुपात दिली जात होती. मात्र, सायंकाळी सहा-साडे सहा वाजताच हे हॉटेल बंद करण्यात येत असल्याने खवय्यांचा हिरमोड होत होता.
लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करुन या हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळता यावे, या उद्देशाने रचनेमध्ये बदल करुन हॉटेल सुरु केले आहे. तसेच, या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खवय्यांच्या नाव-पत्त्याची नोंद केली जात आहे. जेणेकरुन एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे सोपे होणार आहे.
तसेच, हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टेम्परेचर तपासणी, ऑक्सीजन पातळीची तपासणी, सॅनिटायझेशन आदी सोपस्कार केले जात आहेत. शिवाय, एखादा खवय्या उठून गेल्यानंतर टेबल खुर्ची पुन्हा सॅनिटाईज केली जात आहे, असेही मुर्डेश्वर यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक खवय्यांनी मिसळ येथेच बसून खाण्यात मजा आहे; पार्सलला महत्व नाही, असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आता ठाण्याची मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये खाता येणार
Reviewed by News1 Marathi
on
October 07, 2020
Rating:

Post a Comment