Header AD

कल्याणातील गृहनिर्माण सोसायटीच बनली 'कोवीड रुग्णांची केअर टेकर'
कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  कोरोना झाला म्हणून रक्ताची नातीही एकमेकांपासून दूर झाल्याचे अनेक दुर्दैवी प्रकार समोर आले असतानाच कल्याणातील एक गृहनिर्माण सोसायटी मात्र कोरोना रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे सकारात्मक उदाहरण समोर झाले आहे.


नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या गोदरेज हिल परिसरात रोझाली एलएक्स नावाची ही सोसायटी आहे. १८० फ्लॅट्स आणि सुमारे ८०० लोकं याठिकाणी राहत असून त्यांच्यासाठी ही केवळ हौसिंग सोसायटी नाही तर त्यांच्या कुटुंबाइतकीच ती महत्वाची किंवा जवळची आहे. आतापर्यंत या सोसायटीमध्ये तब्बल ३५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये ८२ आणि ८० वर्षांच्या आजी-आजोबांचाही समावेश होता. मात्र कोरोनाच्या या कठीण काळामध्ये या सोसायटीने एकमेकांची विशेषतः कोरोना रुग्णांची अक्षरशः एका कुटूंबप्रमुखाप्रमाणे काळजी घेतली.तर इथल्या ३५ पैकी केवळ ४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि बाकी सर्वांना सोसायटीमध्येच होम आयसोलेशनमध्ये योग्य उपचार आणि आवश्यक ती संपूर्ण मदत करण्यात आली. तीसुद्धा कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम कायदे पाळून आम्ही या सर्व गोष्टी केल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष राकेश पुरस्वानी आणि सेक्रेटरी सुनिल घेगडे यांनी दिली.विशेष म्हणजे कोरोनाच्या या कठीण काळात संपूर्ण सोसायटी सर्वच रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे आणि तितक्याच आपुलकीनेही उभी राहिली. ज्यातून आम्हा सर्वांना कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबासारखा मानसिक आधार मिळाला आणि आम्ही त्यातून लवकर बाहेर येऊ शकलो अशी प्रतिक्रिया एका महिला सदस्यानी दिली. 

कल्याणातील गृहनिर्माण सोसायटीच बनली 'कोवीड रुग्णांची केअर टेकर' कल्याणातील गृहनिर्माण सोसायटीच बनली 'कोवीड रुग्णांची केअर टेकर' Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads