Header AD

मुंब्रा येथेही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा रस्त्यावर चिकटवल्याप्रे षितांना अवमान सहन करणार नाही शानू पठाण


    छाया : प्रफुल गांगुर्डे


ठाणे  | प्रतिनिधी  :  इस्लाम धर्माचे संस्थापक, प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रसिद्ध करणार्‍या शिक्षकाचे समर्थन करणारे तसेच इस्लाम समुदायाला दहशतवादी म्हणणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निषेधार्थ मुंब्रा येथील मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण आणि रिकॉर्ड फेडरेशन यांच्या वतीने शनिवारी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच, त्यांचे छायाचित्र रस्त्यावर चिकटवून ते पायाने तुडविण्यात आले. 
फ्रान्समधील एका नियतकालिकामध्ये एका शिक्षकाने काढलेले अल्लाहचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून छापण्यात आले होते. अल्लाह आणि त्यांचे प्रेषीत हे निराकार-निरामय असल्याने त्यांचे चित्र छापण्यास इस्लाममध्ये मान्यता नाही. त्याविरोधात फ्रान्समधील मुस्लीम बांधवांनी आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चित्र काढण्याच्या वृत्तीचे समर्थन करुन समस्त इस्लाम धर्मियांना दहशतवादी असे संबोधले.  त्या निषेधार्थ सर्व इस्लामी राष्ट्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर अश्रफ (शानू) पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
यावेळी पठाण यांनी सांगितले की, आमच्या प्रेषितांचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही.  आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही. त्यासाठी प्राण त्यागण्यासही आमची तयारी आहे. जगभर गोळीबार होत असतो. अगदी मशिदीमध्येही गोळीबार झालेले आहेत. पण, आता चर्चमध्ये गोळीबार झाला म्हणून समस्त मुस्लीम समुदायाला दहशतवादी ठरवणार हा कोणता न्याय ? कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही. मोहम्मद पैगंबर यांनी शांतीची शिकवण दिली आहे. ते जगात शांतता नांदवण्यासाठीच भूतलावर अवतरलेे होते. म्हणूनच जगातील शांततेचा भंग करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.


मुंब्रा येथेही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा रस्त्यावर चिकटवल्याप्रे षितांना अवमान सहन करणार नाही शानू पठाण मुंब्रा येथेही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा रस्त्यावर चिकटवल्याप्रे षितांना अवमान सहन करणार नाही शानू पठाण Reviewed by News1 Marathi on October 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads