परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी बाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सयुंक्त दौरा
कल्याण | प्रतिनिधी : संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सद्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पिक, भाजीपाला, भातशेती व इत्यादी धान्यांना फटका बसला आहे.
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने ठाणे, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचाच आढावा घेऊन शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दि. २० ऑक्टोंबर २०२० रोजी सयुंक्त दौरा केला. सदर दौऱ्यादरम्यान शिरढोण, बाळेगाव, वाकळण, दहिसर मोरी, मलंगवाडी, कुशिवली, आंबे, ढोके, खरड, मांगरूळ, नेवाळीपाडा, आदी ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेतल्या व झालेल्या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे तातडीचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.
शेतकरी हातातोडांशी आलेला घास हिरवला कि काय या चिंतेत होते, परंतु ज्या – ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहेत, त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असे ठाम आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सर्व शेतकऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले, यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, संबधित शासकीय अधिकारी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नेवाळी सरपंच चैनु जाधव, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, महेश गायकवाड व ग्रामस्त उपस्थित होते.

Post a Comment