Header AD

आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्यकल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  लॉकडाऊन काळात सलग १९३ दिवस पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांची सेवा करण्याचे कौतुकास्पद कार्य आर.एस.पी.च्या अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटने केले आहे. २१ मार्च पहिल्या लॉकडाऊन पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत कल्याण डोंबिवली आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे कमांडर मनिलाल शिंपी यांनी महाराष्ट्राचे महासमादेशक अरविंद देशमुख, पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी, जनजागृती, समाजामध्ये कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा अशाप्रकारे समुपदेशन करित होते.


 हे सर्व करताना संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले असताना रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या व उपासमारीची वेळ समाजातील विविध घटकांना आली. हे पाहून आरएसपी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने परिसरातील विविध संस्थासमाजसेवक व दानशुरलोकांच्यासहकार्याने कल्याणडोंबिवलीटिटवाळाभिवंडीआंबिवलीउल्हासनगरअंबरनाथपरिसरातील गरजूंना मदत म्हणून अन्नधान्याचे किट तयार करून ६ हजार कुटुंबियांना वाटण्यात आले. खाजगी शाळेतील शिक्षकांना या परिस्थितीत पगार बंद केले.  
त्यामुळे अशा शिक्षकांना कल्याण तालुका क्रिडा संघर्ष समिती, स्पोर्टस हेल्पर फौंडेशन यांच्या सहकार्याने चार महिने रेशन वाटप करण्यात आले.समाजसेवा करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटला जेसस इज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर, लिओ क्लब, कल्याण सामाजिक संस्था, सी एन पाटील फाऊंडेशन, माहेर वस्ती स्टार महिला अध्यक्षा रेखा जाधव, आय ई एस टीचरस, सुधीर दिनकर, गिरीष अग्रवाल, कमलेश पटेल, अमित कुकरेजा, समाजसेवक सुरेश धडके आदी समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन अन्नदानाचे कार्ये केले. तसेच रोज ३०० कामगारांना दुपारचे जेवण देण्याचे कार्य अजूनही सुरू आहे.


हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरएसपी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा उप कमांडर मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे अनिल बोरनारे, बापू शिंपी, महादेव क्षीरसागर, अनंत कीनगे, बन्सीलाल महाजन, केशव मालुंजकर, रामदास भोकनळ, सचिन मालपुरे, दत्तात्रय पाटील, कैलास पाटील, राजेंद्र गोसावी, भारती जाधव, जितेंद्र सोनवणे नितिन पाटील,रितेश पाटील, दिलीप पावरा, भानुदास शिंदे, योगेश अहिरे  आदींचे मोलाचे  योगदान आहे. 

आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads