Header AD

आ.शेखर निकम यांच्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्फुर्त प्रतिसादचिपळूण | प्रतिनिधी   :  आ. शेखर निकम यांच्या विधानसभा निवडणूकीच्या वर्षपुर्तींच्या निमित्ताने अण्णा खेडेकर संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व रक्त तपासणी या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.  


या शिबिरामध्ये २७५ पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप करण्यात आले.  याचदिवशी कोविड-१९ या स्थितीत अतिशय महत्त्वपुर्ण योगदान देणारे नगरपरिषदेचे व १०६ अ‍ॅम्बुलन्स वाहक यांचा कोविड योद्धा सन्मान करण्यात आला. यामध्ये चिपळूण नगरपरिषदेच्या स्मशानभूमीमध्ये काम करणारे भाऊ पवार, वैकुंठरथ चालक गणेश खेडेकर,  संकेत मोहिते, तुषार कांबळे, समिर मोहिते, चेतन चिपळूणकर, राकेश कांबळे, अंकित गमरे, अजय कासारे, विराज सकपाळ, ऋषीकेश तांबे, मयूर जाधव, मंदार कांबळष, सचिन हरवडे, दिपक सावर्डेकर, दिनेश जाधव, अभिजीत पाटकर, दिनेश जाधव  यांचा सन्मान करण्यात आला. 


१०६ अ‍ॅम्बुलन्स चालक सिद्धेश शिंदे, सतिश शिर्के, गणेश पाथरे, काशिनाथ फेकडे, राजाराम शिंदे, संतोष भोंगाळे व कादिर आदींचा ही सत्कार करण्यात आला. 


त्याचप्रमाणे आॅक्सिजन सिलेंडर पुरवठा हमिजा इस्माईल परकार वय ६१ यांचा आ. शेखर निकम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  तसेच मिस्टर व मिस सह्याद्री २०२० वर्षेपुर्तीचे औचित्य साधून आॅनलाईन मिस्टर व मिस सह्याद्री व स्पर्धा घेण्यात आली. 


ही स्पर्धा इन्स्टाग्रामवर घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण १३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आॅनलाईन ५०,७०० नागरिकांनी मतदान केले. यामध्ये मिस सह्याद्री म्हणून मृणाली सावंत चिपळूण व मिस्टर सह्याद्री म्हणून पुष्कर शिंदे यांनी बहूमाने पटकावला. उपविजेते कविता चाळके व राहूल काते तसेच उत्तेजणार्थ सायली गुजर, जान्हवी तांबट, सुरज रेडीज, व मनिष सुर्वे यांना सन्मानित केले. तसेच या वर्षपुर्तीच्या निमित्ताने माजी आ. रमेश कदम यांचा वाढदिवस ही करण्यात आला. 


कोविड- १९च्या धर्तीवर पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य गावागावात जाऊन जनजागृती करणार असून त्याचा ही शुभारंभ करण्यात आला  व बोंडला स्पर्धाही आॅनलाईन घेण्यात येणार आहे. त्याचेही उद्घाटन करण्यात आले.


यावेळी आ.शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, जयंद्रथ खताते, दादा साळवी, शौकत मुकादम, सुचय अण्णा, बिलाल परकार, स्वप्नील शिंदे, चित्रा चव्हाण, जागृती शिंदे, पांडुशेठ माळी, मिलिंद कापडी, दिशा दाभोळकर, रतन पवार, सर्व नगरसेवक, जि.प.सदस्य,  पं.स.सदस्य, डॉ. राकेश चाळके, दशरथ दाभोळकर, सतिश खेडेकर, शहरातील युवक, युवती, आजी-माजी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नॅबआय हॉस्पिटलचे डॉ. स्वानंद देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी मोतिबिंदू तपासणी केली. संपदा गुढेकर, हिंद लॅब यांनी हिमोग्लोबिन, थायरॉट, कॅलशियम तपासणक्ष केली. विधी आयुवॅरिकमार्फत डॉ. अनुपमा कदम यांनी रक्त शुगर चेक करण्यासाठी सहकार्य केले.तसेच डॉ. हफिजा परकार यांनी आरोग्य विषयक विविध औषधांची माहिती दिली.


आ.शेखर निकम यांच्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद आ.शेखर निकम यांच्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads