Header AD

भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२० : आजच्या सत्रात भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली. या प्रगतीचे नेतृत्व बँक आणि ऑटो क्षेत्राने केले. निफ्टी १.३८% किंवा १५९.०५ अंकांनी वधारला व ११,६०० ची पातळी ओलांडत ११,६६२.४० वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.५४% किंवा ६००.८७ अंकांनी वाढला व ३९,५७४.५७ अंकांवर स्थिरावला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११६५ शेअर्स घसरले, १४८८ शेअर्सनी नफा कमावला तर १५९ शेअर्स स्थिर राहिले. टाटा मोटर्स (७.८८%), एचडीएफसी (७.५६%), अदानी पोर्ट (३.४५%), एमअँडएम (३.५४%) आणि इंडसइंड बँक (३.३७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर ब्रिटानिया (१.४७%), कोल इंडिया (१.१८%), विप्रो (१.३२%), हिंडाल्को (१.३४%) आणि टाटा स्टील (१.१८%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

आयटी, फार्मा, एनर्जी आणि एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात विश्रांती घेतली. बीएसई मिडकॅप ०.५९% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.५५% नी वधारला.


इंडसइंड बँक लिमिटेड: इंडसइंड बँकेचे शेअर्स ३.३७% नी वाढले व त्यांनी ६२१.८५ रुपयांवर व्यापार केला. बँकेने २०२१ या वित्तीय वर्षातील दुस-या तिमाहीतील अंदाजे आकडेवारी जारी केल्यानंतर हे परिणाम दिसले. जुलै-सप्टेंबर तिमाहित बँकेचे डिपॉझिट १० टक्क्यांनी वाढले तर नफ्यात वार्षिक वृद्धी २% झाली.


टाटा मोटर्स लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील दुस-या तिमाहीत टाटा मोटर्सची एकूण विक्री १६% नी घटली. जग्वार लँड रोव्हरसहित एकूण आकडा २,०२८७३ युनिट एवढ्यापर्यंत झाला. या घसरणीनंतरही कंपनीच्या स्टॉक्सनी ७.८८%ची उच्चांकी घेतली व आजच्या सत्रात १४४.४५ रुपयांवर व्यापार केला.


थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड: थायरोकेअर टेक्नोलॉजीजने ४ लाख कोव्हिड-१९ आरटी-पीसीआर टेस्ट घेतल्या. कंपनीचा महसूल ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत ३७% नी वाढला. मागील तिमाहिच्या तुलनेत लो रिव्हेन्यू १७१ टक्क्यांनी वाढला. कंपनीचे स्टॉक्स १३.८७ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ८८२.५० रुपयांवर व्यापार केला.


रामको सिस्टिम्स लिमिटेड: कंपनीचे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील केमिकल बिझनेस विभागाची वितरण साखळी काम बदलून देण्यासाठी टोल लॉजिस्टिकने रामको लॉजिस्टिक्स इआरपी कंपनीची निवड केली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ४.९९% नी वाढले व त्यांनी ४९१.३० रुपयांवर व्यापार केला.


भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये सलग दुस-या दिवशी नफा होऊनही भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.४६ रुपयांचे मूल्य कमावले.


जागतिक बाजार: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारण झाल्यानंतर गुंतवणुकदारांनी अधिक वित्तीय मदतीची आशा केल्याने जागतिक निर्देशांत हिरव्या रंगात दिसून आले. नॅसडॅकने २.३२%, एफटीएसई १०० ने ०.०८% ची वृद्धी घेतली. तर एफफटीएसई एमआयबीने ०.५१%, निक्केई २२५ ने ०.५२% ची आणि हँगसेंग कंपनीने ०.९०% ची वृद्धी अनुभवली.

भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार

■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....   कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :   रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार...

Post AD

home ads