Header AD

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथठाणे  |  अशोक घाग  :  केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आज  अधिकारी-कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलन शपथ घेतली. यावेळी राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांनी दिलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. सामान्य प्रशासन विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार यांनी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. त्याचबरोबर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी सिसोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) समिना शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मन पवार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे,  समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, महिला व बाल विकास विभाग आदि विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads