Header AD

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा चौकशी करायची असेल तर तत्कालीन सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा केंद्रीयराज्य मंत्री रामदास आठवले

 


मुंबई दि. 16  - जलयुक्त शिवार या शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनेची चौकशी करण्याचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  महाविकास आघाडी सरकार ने घेतलेला निर्णय सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करायची असेल तर तत्कालीन महायुती सरकार मधील शिवसेनेच्या मंत्र्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. 


शिवसेने ने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती मात्र अजून त्या दृष्टीने कोणते एक तरी पाऊल महाविकास आघाडी सरकार ने टाकले आहे का? कधी करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? 


आता झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पिके भिजून वाहून गेली आहेत. त्यांना तातडीने 15 लाखांची मदत शासनाने द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना रामदास आठवले यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा चौकशी करायची असेल तर तत्कालीन सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा केंद्रीयराज्य मंत्री रामदास आठवले जलयुक्त शिवार योजनेच्या  चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा चौकशी करायची असेल तर तत्कालीन सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा केंद्रीयराज्य मंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत

डोंबिवली (शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी मधील जवळपास ९० टक्के कारखान्या मध्ये केमिकल मिश्रित सांडपाणी हे सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यत वाहून ...

Post AD

home ads