Header AD

कल्याण डोंबिवलीत ३६७ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

 

एकूण ४५,५४२ रुग्ण तर ८९० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत २०१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या ३६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४५,५४२ झाली आहे. यामध्ये ३६६५ रुग्ण उपचार घेत असून ४०,९८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६८कल्याण प  १४७डोंबिवली पूर्व ९५डोंबिवली प- ४६मांडा टिटवाळा  तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून३ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून,  ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ३६७ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ३६७ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीतील सरवली एमआयडीसी मध्ये भीषण आग दहा तास आग धुमसत राहिली आग

   भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी मधील कपिल रेयॉन प्रा लिमिटेड या अत्याधुनिक यंत्रमागावर कपडा तयार करणाऱ्या कंपनील...

Post AD

home ads