विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान
कल्याण : कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचारी अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. याबद्दल विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने दादासाहेब गायकवाड यांच्या ११८ व्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नेतीवली येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचारी, डॉकटर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी समितीच्या वतीने कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तर दलितमित्र अण्णासाहेब रोकडे यांनी उपस्थित सर्वांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. समितीच्या अध्यक्षा भारती जाधव, सचिव रसिका टेंभुर्णी, खजिनदार सुशीला नितनवरे, दर्शना गायकवाड, सुरेखा मोहोड, शिल्पा अंबादे, अर्चना कदम उपस्थित होत्या.

Post a Comment