Header AD

बकरी व्यवसायात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक


दोघांना अटक करत ७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई....


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  बकरी पालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देतो याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. तर या टोळीचा म्होरक्या अद्यापही फरार आहे.


कल्याण पश्चिमेतील भानुसागर टॉकीज जवळ हीना अपार्टमेंट मध्ये अनमोल साई ॲग्रो गोट नावाची एजेन्सी होती.  कमलकांत यादव व त्याचे साथीदार माधुरी देशमुख,  राजेश गुप्ता, पवन दुबे हे चौघे बकरी पालनचा व्यवसाय करत होते. मुरबाड येथे गोट फार्म असुन त्यामध्ये ५० बकऱ्या असल्याबाबत लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवणुक केल्यास एका वर्षात दुप्पट रक्कम् करून देतो असे आश्वासन देवुन त्यांचेकडुन चेकने तसेच ऑनलाईन व रोखीने पैसे स्विकारत होते. आतापर्यंत यांनी अनेक लोकांकडून जवळपास ४० लाख रुपये घेतले आहेत. काही लोकांना पैसे मिळाले नाही. याचवेळी कंपनीचा मालक कमलाकांत यादव पळून गेला. म्हणून लोकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


 वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांनी तपास सुरु करत लोकांना गंडा लावणाऱ्या घाटकोपर येथील पवन दुबे याला हैद्राबाद येथील हयात नगर येथून तर राजेश गुप्ता याला ओटी सेक्शन उल्हासनगर येथून अटक केली आहे. तर यांचा म्होरक्या कमलेश यादव आणि साथीदार माधुरी देशमुख हे अद्याप फरार आहेत. या अटक आरोपींकडून पोलिसांनी ६ लाख ४० हजार ८०० रुपये रोख रक्कम, एक लेनोवा कंपनीचा लॅपटॉपपॅनॉसॉनिक कंपनीचा ए सी युनिटएक लाकडी टेबल  खुर्चा असा एकुण ७ लाख ८०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी वपोनि नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. (गुन्हे) संभाजी जाधव, सपोनि देविदास ढोलेपो.ना. एस. एच. भालेरावपो.ना एन.डी.दळवीपो.शि. के.एन. सोंगाळ यांनी केली आहे.

बकरी व्यवसायात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक बकरी व्यवसायात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक Reviewed by News1 Marathi on October 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads