डोंबिवली | शंकर जाधव : कोरोना काळात रेल्वे सेवा बंद असल्याने सर्वांचे हाल झाले होते.राज्य सरकारने आरोग्य सेवा देणारे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली होती.मात्र सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवास करण्यास मनाई असल्याने नाराजी पसरली होती.याबाबत लक्ष देत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी डोंबिवली रेल्वे स्टेशन उपप्रबंधक परमानंद यांची भेट घेऊन निवेदन दिले. सात महिन्यापासून लोक घरात असून त्यांना आता पोटासाठी कामावर जावेच लागणार आहे.त्यामुळे महिला वर्गाला रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना कल्याण- डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, डोंबिवली पश्चिम महिला संघटक किरण मोंडकर, डोंबिवली पूर्व शहर महिला संघटक मंगला सुळे, डोंबिवली ग्रामीण महिला संघटक कविता गावंड यांसह सीमा अय्यर, शिल्पा मोरे, स्वाती मोहिते, प्राजक्ता दळवी, विमल बुरसे, संगीता चव्हाण, सुलोचना जाधव आणि सुवर्णा पाडमुख यांनी उपस्टेशन प्रबंधक परमानंद यांना निवेदन दिले.यावेळी शिवसेना महिला पदाधिकारी यांनी महिला वर्गाला प्रवास करण्यास केंद्र सरकार का आडकाठी घालत आहे असा प्रश्न उपस्थित केला.वैशाली दरेकर म्हणाल्या, राज्य सरकार हे सर्वसामन्याचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आता कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर होऊन सात महिने उलटले आहेत.
एखादी महिला आजारी असल्यास आणि ती सरकारी कर्मचारी नसेल तर उपचार घेण्यासाठी कशी लोकलने प्रवास करणार? नोकरी करणाऱ्या महिलांना देखील बसने प्रवास करताना त्रास होत आहे. त्यांची तारांबळ उडत आहे. लोकल ट्रेन सुरू झाल्यास महिलांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल.तर कविता गावंड म्हणाल्या,सर्व महिलांना रेल्वे प्रवास करण्यास मनाई यात नक्कीच केंद्र सरकारचे राजकारण असू शकते. काही महिलांना रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.त्यांना नोकरी निमित्त क होईना लोकल सुरू केली पाहिजे.यासंदर्भात उपप्रबंधक परमानंद यांना विचारले असता त्यांनी पुढील दोन दिवसात लोकल वाढवल्या जाणार असून फेऱ्याही वाढणार आहेत.मात्र सारब महिलांना लोकल सेवा देण्यास परवानगी अद्याप तरी मिळाली नसल्याचे सांगितले.
Post a Comment