Header AD

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त युवक कॉंग्रेसचे रक्तदान

 


कल्याण  | प्रतिनिधी  :  भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कल्याण जिल्हा युवक काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष मनिष देसले यांच्या मार्फत करण्यात आले होते.


सद्यस्थितीत कोरोना सोबतच इतरही अनेक आजारांवर मात करण्यासाठी रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. मात्र सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रूग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. हि   समस्या लक्षात घेत कल्याणमध्ये युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कल्याण पश्चिमेतील संकल्प रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजाबद्दल असलेली आपली बांधिलकी जपली.
यावेळी ए.आय.पी.सी जिल्हाध्यक्ष बंटी परदेशी, प्रदेश सचिव गायत्री सेन, जिल्हा सरचिटणीस प्रसन्न ताकपेरे, अविनाश दीक्षित, शैलेश खंडेलवाल, फिरोज मुल्लानी, राजेश कलाशेट्टी, अक्षय सोनवणे  व इतर सदस्य उपस्थित असल्याची माहिती युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष देसले यांनी दिली. 


इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त युवक कॉंग्रेसचे रक्तदान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त युवक कॉंग्रेसचे रक्तदान Reviewed by News1 Marathi on October 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads