Header AD

कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीची आढावा बैठक संपन्न

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत कामाच्या बाबतीत शनिवारी बैठक संपन्न झाली. कल्याण महापालिकेला आतापर्यंत १९६ कोटी रुपये निधी देण्यात आला असुन स्मार्ट सिटी अंतर्गत शहारामधील मुख्य रस्यावरील चौकामध्ये स्गिनल यंत्रणा सुरू करून सी सी टी व्ही यंत्रणा बसविण्यात येत असुन काँम्नड अँन्ड कँट्रोल सेन्टर, सिटी पार्क कामे सुरू असुन शहाराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू असल्याने लवकरच कल्याण डोंबिवली शहरे कात टाकणार असे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. 


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्मार्ट सिटीमध्ये महत्वाच्या कामांचा समावेश करण्याची गरज होती. शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्राथमिक सुविधा व महत्वांच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. त्यातून शहराचा कायापालट झाला असता. मात्र, त्यात महापालिका अपयशी ठरली आहे, असा आरोप करीत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. एकिकडे १२० कोटी खर्चून सीसीटीव्ही बसविले जात असताना, शहरात प्राथमिक व महत्वाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


खासदार श्रीकांत शिंंन्दे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात प्रक्लप सुरू आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत लोकप्रतिनिधी सल्ला देण्याचे काम केले स्मार्ट सिटी अंर्तगत स्गिनल यंत्रणा काँम्नड अँन्ड कँट्रोल चे काम सुरू आहे आगमी काळात शहरामध्ये विविध प्रोजेक्ट पाहयाला मिळतील. 


केडीएमसी स्मार्ट सिटी काँर्परेशनचे सुरूवातीला दोन वेळा सल्लागार बदलण्यात आले. तंत्रिक अडचणी असल्याने ज्या वेगाने कामे व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. फेब्रुवारी मध्ये आयुक्त पदाचा पदभार  स्वीकरल्या पासुन स्मार्ट सिटीच्या कामांना प्रचंड गती दिली आहे. सिटी लेव्हल अँडव्हायझरच्या तीन बैठका घेतल्या. कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणा व्यस्त होती. पावसाचा व्यत्यय होता. कल्याण स्टेशन परिसराचे काम, एलईडी बसविण्याचे काम, काळातलाव परिसर, सिटी गार्डन, पाणी पुरवठा लाईन ही कामे मार्गी लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण डोबिवली स्मार्ट सीटी झाल्याचे पाहायला मिळणार असल्याचे आयुक्त  डाँ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


या आढावा बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, राजू पाटील, रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी   अभियंता तरूण जुनेजा आदीजण उपस्थित होते.कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीची आढावा बैठक संपन्न कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीची आढावा बैठक संपन्न Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads