डोंबिवलीकरांसाठी परिवहन बससेवेकडून ब्रेक मनसेकडून प्रशासनावर टीका
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याणला शहराकडे लक्ष आणि डोंबिवली शहराला सापत्य वागणूक पालिका प्रशासनाकडून दिली जाते. याचा आणखी एक प्रयत्य डोंबिवलीकरांना आला आहे.परिवहन समितीनचे सभापती मनोज चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून शहराबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर परिवहन बसेस सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रशासनाकडून हिरवा सिग्नल मिळाला असून शनिवार पासून कल्याण-पनवेल बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र डोंबिवलीतून अशी सेवा सुरु झाली नाही. परिवहन समितीच्या या भूमिकेवर मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
कल्याण –पनवेल नंतर कल्याण-वाशी,कल्याण-कोकणभवन आणि कल्याण-ठाणे बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. मात्र डोंबिवली-पनवेल, डोंबिवली-वाशी, डोंबिवली ठाणे बस सेवा सुरु करण्याकडे परिवहन समितीने लक्ष दिले नसल्याने मनसे भूमिकेवर मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष कदम यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. सर्व बस कल्याण मधून सोडणार असाल तर डोंबिवलीकरांनी फक्त तासनतास बसच्या लाईनीत उभे रहायचे का असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे.
महापौर विनिता राणे आणि विरोधी पक्ष नेते राहुल दामले,स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, आणि भाजप गटनेते शैलेश धात्रक, कॉंग्रेस गटनेते नंदू म्हात्रे हे डोंबिवलीत राहत असूनही डोंबिवलीकरांना सापत्य वागणूक मिळत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला डोंबिवली शहराकडे लक्ष देण्यास वेळ मिळतोय कि नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
डोंबिवलीतील सर्व सामान्य नागरीक कामावर जाण्यासाठी सकाळी ४ वाजल्यापासून बाजीप्रभू चौकात एसटीची वाट पाहत रांगेत उभे राहतात.सर्वसामान्यासाठी लोकल सेवा बंद असल्याने या नेहमीचा त्रास डोंबिवलीकरांना सहन करावा लागतो. निदान वाशी, ठाणे आणि पनवेलला जाण्यासाठी परिवहन बस सेवा सुरु झाल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.परंतु याकडे लक्ष देण्यास प्रशासन,सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला वेळ नाही असे एकूण परिस्थितीवरून दिसत असल्याचेहि कदम यांनी सांगितले.

Post a Comment