Header AD

बदलापूरातील नवदुर्गांचा भाजपातर्फे सन्मान खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती


भाजपच्या कुळगाव-बदलापूर महिला मोर्चाच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान करताना खासदार कपिल पाटील....


बदलापूर  |  प्रतिनिधी  :   कुळगाव-बदलापूर शहरात विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्या नवदुर्गांचा भाजपातर्फे सन्मान करण्यात आला. भाजपा महिला मोर्चाच्या बदलापूर पश्चिम व पूर्व भागातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती होती.
नवरात्रोत्सवानिमित्ताने भाजपा महिला मोर्चातर्फे नवदुर्गा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या माजी नगरसेविका रुचिता घोरपडे व निशा घोरपडे यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी खासदार कपिल पाटील, भाजपाचे आमदार व जिल्हाध्य़क्ष किसन कथोरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, प्रदेश सदस्य प्रणिता कुलकर्णी, सरचिटणीस विद्या पाटील आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमासाठी मीनल मोरे व मंगल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रती पाटकर, मेघा गुरव, मनीषा आंबेकर, शांताबाई शिंदे, संध्या बर्वे, हर्षदा सोलासे, अनिता वाघमारे, प्रिया झोरे, भक्ती दाखोरे, प्रमिला पाटील, स्वाती बेलांके, लता आंबेकर आदींनी मेहनत घेतली. प्रत्येक कुटुंबाला उभे करण्याबरोबरच सावरण्यात कुटुंबातील महिलेची ताकद असते. बदलत्या काळात कुटुंबाप्रमाणेच समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांकडून उत्तम व नाविन्यपूर्ण कामगिरी बजाविली जात आहे. नवदुर्गा सन्मान कार्यक्रमानिमित अशा महिलांचा केलेला सन्मान हा महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत खासदार कपिल पाटील यांनी कौतूक केले. नवदुर्गांपासून स्फूर्ती घेऊन अनेक महिला विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावतील, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.



बदलापूरातील नवदुर्गांचा भाजपातर्फे सन्मान खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती बदलापूरातील नवदुर्गांचा भाजपातर्फे सन्मान खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads