भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी चिपळूण भाजपाची मागणी
चिपळूण | प्रतिनिधी : भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर हे स्वतः शेतकरी असल्यामुळे तसेच शेतकर्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील भात शेती जमीनदोस्त झालेली आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कापणीला आलेली शेती तसेच हाती आलेले पीक निघुन गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
कोरोनाचे संकट आणि लाॅकडाउन यामुळे झालेले आर्थिक संकट व पावसामुळे शेतीची नुकसान या परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिपळूण भाजपाने तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रणय वाडकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, तालुका चिटणीस संदेश शेलार, अध्यात्मिक समन्वय तालुका संयोजक प्रकाश तांबीटकर, योगेश पेवेकर, जितेंद्र गांधी, अरविंद जाधव, सुभाष जाधव, महेंद्र जाधव, स्वप्नील जाधव उपस्थित होते.

Post a Comment