ट्रुकने फिट बड्स आणि फिट प्रो पॉवर केले लॉन्च
मुंबई : ऑडिओ ब्रँड ट्रुकने संगीताची प्रचंड आवड असलेल्या आणि उत्कृष्ट संगीत अनुभवाच्या शोधात असलेल्यांसाठी आरामदायीपणानुसार डिझाइन केलेले फिट प्रो पॉवर आणि फिट बड्स हे नवे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. फिट प्रो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो म्हणजे १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ३ तासांचे प्लेब्लॅक होते तर २५ मिनिटांत पूर्णपणे चार्जिंग करता येते. २०० एमएएच चार्जिंग केस इअरबड्स अनेकदा चार्ज करता येते. ट्रुक फिट बड्समध्ये ५०० एमएएच चार्जिंग केस आहे.दुस-या पिढीतील डॉल्फिन डिझाइनचे हे ओपन फिट डीप बास आजपासून अॅमेझॉनवर उपलब्ध असतील.
ट्रुक फिट बड्समध्ये सिंगल चार्जवर ३.५ तास प्लेबॅक आणि ३ तास कॉल ड्युरेशन मिळते. यात १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह हाय फिडेलिटी साउंडची सुविधा आहे. यातील इन्स्टांट पेअरिंग टेक्नोलॉजीत ब्लूटूथ ५.० ची सुविधा असून याद्वारे ९९ टक्के स्मार्टफोन्स आणि गेमिंग उपकरणांशी इअरबड्स कनेक्ट करण्याची सोय होते. इअरबड्स १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह हाय फिडेलिटी साउंडची खात्री दिली जाते. ट्रुक फिट बड्स ७९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहेत.
ट्रुकने फिट बड्स आणि फिट प्रो पॉवर केले लॉन्च
Reviewed by News1 Marathi
on
October 04, 2020
Rating:

Post a Comment