चिपळुणात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या गावागावात बूथ कमिट्या स्थापन होणार जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी केलेले मार्गदर्शन
चिपळूण | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी चिपळुणातील महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्तींना बुध कमिट्या स्थापन करण्याविषयी मार्गदर्शन केले. या बुथ कमिटीमध्ये एक महिला अध्यक्षा तर उर्वरित दहा महिला सदस्या यांचा समावेश असणार आहे.
यावी चिपळूण तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, माजी सभापती व विद्यमान सदस्या पूजा निकम रिया कांबळे, जि. प. सदस्या दिशा दाभोळकर निकिता सुर्वे माजी नगरसेविका सीमा शेळके आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होत्या.

Post a Comment