Header AD

कल्याण डोंबिवलीत २०८ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू


,३५७ एकूण रुग्ण तर ९३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३१६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या २०८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,३५७ झाली आहे. यामध्ये ३००२ रुग्ण उपचार घेत असून ४,४१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५कल्याण प – ७८डोंबिवली पूर्व ४९डोंबिवली प- ३०मांडा टिटवाळा – तर मोहना येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६५ रुग्ण टाटा आमंत्रामधून७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोवि रुग्णालयातून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २०८ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत २०८ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ॲड. प्रकाश आंबेडकर घेणार एन.आर.सी आंदोलन कर्त्यांची भेट

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मोहने येथील एन.आर. सी कंपनीच्या कामगार व महिला वर्गाने येथे तंबू ठोकून आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याकरिता ग...

Post AD

home ads