Header AD

शेतकरी कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणी साठी ठाणे जिल्हा काँग्रेस इंटकची एक दिवसीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली

 


ठाणे  |  प्रतिनिधी  :  एकीकडे सर्वत्र पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रसंगी केद्रातील सरकारणे शेतकरी वर्गासाठी काही भरिव मदत करावयाचि असताना उलट शेतकरी बांधवासाठी कोरोना प्रादुर्भावचा काळात तीन नवीन विघेयके मंजूर केली हि विधेयके मंजूर करित असताना विरोधी पक्षाची देखील मते घेतली नाहीत या विधेयकामुळे शेतकरी वर्गासाठी मोठा धोका करण्याचा प्रयत्न चालवला आहे अशी टिका जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली.


अ.भा.काॅग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.2 ऑक्टोबर "राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विघेयक व काॅग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कामगारांना सुरक्षा देण्याकामी घेतलेले निर्णय बदलण्याची तयारी चालु केली आहे या दोन्ही विधेयकामुळे कीसान व कामगार हे देशोधडीला लागणार असून या निर्णयाविरोधात कामगार वर्ग व नागरिकांच्या "सह्याची मोहीम" ठीकठीकाणी चालू असून ठाणे जिल्हा इंटक (INTUC) च्या वतीने ठाण्यातील खोपट एस्.टी.स्टॅन्ड बाहेर सकाळी 10 वाजता सह्यांची मोहीम चालू केली असून या मोहिमेची सुरूवात ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी ठाणे काँग्रेस सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,महाराष्ट्र प्रदेश इंटकचे उपाध्यक्ष डाॅ.संदिप वंजारी,काँग्रेसचे माजी गटनेते संजय घाडीगावकर,ठाणे काँग्रेस महिला अध्यक्षा सौ.शिल्पा सोनोने,ठाणे काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,शेतकरी वर्ग व कामगार वर्गासाठी केंद्र सरकारने सातत्याने धक्का तंत्राचा वापर करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करीत आले आहे, आता जनतेने हे सहन केले नाही पाहिजे असे सांगितले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनीही आपल्या आक्रमक शैलीत केंद्र सरकारने कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले हे सांगितले. 


या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर  नागरिक व कामगारानी सहभागी होउन आपला निषेध नोदविला,याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य अँड. प्रभाकर थोरात,सुखदेव घोलप,शहर काँग्रेसचे भालचंद महाडीक,शैलेश शिंदे,प्रकाश मांडवकर,शिरीष घरत,प्रसाद पाटील,स्वप्निल कोळी,बाबू यादव,मंजूर खत्री,काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,सचिन साळवी,उमेश केसरकर,जानबा पाटील, मपप्पू सिंग,प्रवक्ते रमेश इंदिसे,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष स्वप्निल भोईर,अनू.जमाती विभाग अध्यक्ष विश्वनाथ किरकीरे,एस्.टी.इंटकचे मनेश सोनकाबळे,शाताराम भोईर,आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

शेतकरी कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणी साठी ठाणे जिल्हा काँग्रेस इंटकची एक दिवसीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली शेतकरी कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणी साठी ठाणे जिल्हा काँग्रेस इंटकची एक दिवसीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads