राज्य सरकार विरोधात चिपळूण भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन
महाविकास आघाडी विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.....
चिपळूण | प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार विरोधात भाजपा चिपळूण महिला मोर्चातर्फे चिंचनाका येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला सदरील आंदोलन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा महिला मोर्चा तर्फे महिनाभरापूर्वी निवेदन देऊन महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप महिला मोर्चातर्फे महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आले. यामध्ये चिपळुनात देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देताना 'महिलांवरील अत्याचार थांबवा, नाहीतर खुर्च्या खाली करा' आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नीलम गोंधळी म्हणाल्या की, कोविड सेंटरमध्ये देखील महिला सुरक्षित नाहीत, ही बाब गंभीर आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र, महाविकास आघाडी याकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी महिनाभरापूर्वी निवेदन देऊन महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. परंतू, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा महिला मोर्चातर्फे आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळुनात देखील आंदोलन करण्यात आले असून महाविकास आघाडीने याची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलने केली जातील असा इशारा दिला. यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, माजी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रश्मी कदम, जिल्हा कार्यकारणी सदस्य स्नेहा सुखदरे, मंडणगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुशीला पाटील, चिपळूण शहराध्यक्ष अश्विनी ओतारी, मंडणगड शहराध्यक्षा अंजली महाडिक, मालती जाधव, वैभवी चव्हाण, शितल गोंधळेकर, मानसी कांबळी, अंजली महाडिक, संध्या भालेकर, रोशनी पेवेकर, श्रेया मुरकर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, भाजपा महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष प्रतिज्ञा कांबळी, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, उत्तर रत्नागिरी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, सुयश पेठकर, आदी उपस्थित होते.

Post a Comment