Header AD

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्या मुळे सील स्थावर मालमत्ता विभागाची कारवाईठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील भाडेतत्वावरील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्यामुळे आज स्थावर मालमत्ता विभागाच्यावतीने सील करून ताब्यात घेण्यात आले...


ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील भाडेतत्वावरील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्यामुळे आज स्थावर मालमत्ता विभागाच्यावतीने सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. 


    दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकले असुन महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने त्याबाबत वेळोवेळी नोटीस देवून देखील भाडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज सर्व गाळे सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत. 

         यामध्ये मधुकर मुळूक यांची  रु .६ , ९ ४,५७७, मधुकर मुळूक रु .८,१०,७७ ९, प्रमोद इंगळे रु .४,३७,३ ९ ३, मनोहर  इंगळे रु .३ , ९ ७,१५४, प्रकाश दळवी रु ३,८ ९ , ४६८, हरियाली पुनव सिंघवी  रु .१,८७,३७१, तर कुणाल बागुल यांची  रु .५,२१,४६१ इतकी थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांचे गाळे आज सील करण्यात आले आहेत.


       सदरची कार्यवाही ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेशानुसार करण्यात आली आहे.  स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त श्रीम.अश्विन वाघमळे, कार्यालयीन अधिक्षक महेश आहेर यांच्या  मार्गदर्शनाखाली जीतेश सोलंकी, प्रविण वीर, तुषार जाधव,भुषण कोळी यांनी पोलिस बंदोबस्तात केली. 


     दरम्यान सदरचे गाळे महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असुन उर्वरीत गाळ्यांची मुदत संपली आहे. ते सर्व गाळे ताब्यात घेऊन शासन निर्देशनुसार ई- निविदा पद्धतीने देण्यात येणार आहेत.

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्या मुळे सील स्थावर मालमत्ता विभागाची कारवाई दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्या मुळे सील स्थावर मालमत्ता विभागाची कारवाई Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads