Header AD

वित्तीय, एफएमसीजी आणि फार्मा समभागांच्या नेतृत्वात शेअर बाजारात तेजी


निफ्टी ११,८५० च्या पुढे तर सेन्सेक्स ३७० अंशांनी वधारला..


मुंबई, २७ ऑक्टोबर २०२० : भारतीय निर्देशांक वित्तीय, एफएमसीजी आणि फार्मा स्टॉक्समधील नफ्याच्या आधारे काही टक्क्यांनी वधारलेला दिसून आला. निफ्टी १.०३% किंवा १२१.६५ अंकांनी वधारला आणि ११,८५० ची पातळी ओलांडत ११,८८९.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.९४% किंवा ३७६.६० अंकांनी वधारला व ४०,५२२.१० अंकांनी वाढला. आज जवळपास १२४९ शेअर्सनी नफा कमावला, १३५४ शेअर्सनी नुकसान झेलले तर १७८ शेअर्स स्थिर राहिले.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात कोटक बँक (११.७०%), नेस्ले (५.६९%), श्री सिमेंट (५.२६%), आणि बजाज फायनान्स (४.३८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एचडीएफसी (२.१०%), टीसीएस (१.९९%), ओएनजीसी (१.८३%), इन्फोसिस (१.६१%) आणि विप्रो (१.४६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि पीएसयू बँक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.६५% आणि ०.६०% नी वधारले.


महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.: २०२१ या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात ३४% ने वृद्धी घेत तो ३५३ कोटी रुपये झाल्याची नोंद केली. कंपनीचे एकूण उत्पन्न ५% नी वधारले. ही वृद्धी होऊनही कंपनीचे शेअर्स ४.०१% नी घसरले व त्यांनी १२५.७० रुपयांवर व्यापार केला.


एलजी बालक्रिष्णन अँड ब्रोस लि.: कंपनीने २०२१ या वित्तवर्षातील दुस-या तिमाहीतील निकाल घोषित केल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ६.४५% नी वधारले व त्यांनी २६४.९५ रुपयांवर व्यापार केला. सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २३.७२% नी घसरून २७.८२ कोटी रुपये एवढा झाला.


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड.: इक्विनॉरने कंपनीला धोरणात्मक भागीदार म्हणून निवडल्यानंतर टीसीएस लिमिटेडचे शेअर्स १.९९% नी वाढले व त्यांनी २,६३४.८० रुपयांवर व्यापार केला. इक्विनॉर या कंपनीचे नॉर्वे येथे मुख्यालय असून ती जागतिक ऊर्जा कंपनी आहे. टीसीएस लिमिटेडशी भागीदारी करून कंपनीला डिजिटायझेशनचा प्रवास वेगाने करण्याचा उद्देश आहे.


सीएट लिमिटेड: सीएट लिमिटेड कंपनीने २०२१ या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.१९% नी वधारले व त्यांनी १,१४२ रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या महसूलात १७% वाढ होऊन तो १९७८ कोटी रुपयांवर पोहोचला. तर ईबीआयटीडीए ७१.७ टक्क्यांनी वाढून २९२.५ कोटी रुपयांवर पोहोचला.


भारतीय रुपया: आजच्या व्यापारी सत्रात सुरुवातीला भारतीय रुपयाने १० पैशाची घसरण घेतली. अस्थिर देशांतर्गत बाजारामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तो ७३.९५ रुपयांपर्यंत पोहोचला.


जागतिक बाजार: कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे जागतिक बाजाराने कमकुवत व्यापार केला. एफटीएसई १०० अपवादात्मक स्थितीत ०.०८% नी वधारली. मात्र इतर सर्व प्रमुख जागतिक निर्देशांक लाल रंगात स्थिरावले. नॅसडॅकने १.६४%, निक्केई २२५ ने ०.०४% तर हँगसेंग व एफटीएसई एमआयबीने अनुक्रमे ०.५३% व ०.४७% ची घसरण अनुभवली.वित्तीय, एफएमसीजी आणि फार्मा समभागांच्या नेतृत्वात शेअर बाजारात तेजी वित्तीय, एफएमसीजी आणि फार्मा समभागांच्या नेतृत्वात शेअर बाजारात तेजी Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads