Header AD

सरकारने स्वतःच घर चालवण्यासाठी बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत


भाजप आमदार गणपत गायकवाडांची आघाडी सरकारवर टीका....


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  भाजपकडून सरकारकडे  मंदिरे उघडण्याची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कल्याण पूर्वेत देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकार्यानी तिसगाव येथील जरीमरी देवी मंदिरासमोर घंटानाद करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारने बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत. मंदिर आणि जिम लोकांची गरज आहे मात्र सरकार फक्त स्वतःचे घर चालवण्यासाठी बार आणि अवैध धंदे सुरू केले असल्याचा आरोप केला तसेच यावेळी लवकारात लवकर मंदिरे उघडण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, जरीमरी सेवा मंडळ अध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारने स्वतःच घर चालवण्यासाठी बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत सरकारने स्वतःच घर चालवण्यासाठी बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads