आत्मनिर्भय भारत अंतगर्त डोंबिवलीत महिला बचतगत व कार्यकर्त्यांसाठी `श्रीराम अगरबत्ती`चे उत्पादन
डोंबिवली | शंकर जाधव : प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनातून आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिला बचतगट व कार्यकर्त्यांसाठी भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल कार्यालयात `श्रीराम अगरबत्ती` या उत्पादनचे उदघाटन कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे व कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे कल्याण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी कल्याण जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश दुबे ,जेष्ठ पदाधिकारी महेंद्रसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला बचतगट व व्यवसाय करू इच्छित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात बचत गट व गरजू ,कारकर्त्यांसाठी रोजगार निर्मिती म्हणून केलेला उपक्रम असून सर्व नफा हा कसोशीने व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिक कार्यकर्त्याला मिळेल.
उत्पादक /व्यवसायिक /ग्राहकराजा,असा हा त्रिमूर्तींचा व्यवसायिक प्रवास असल्यामुळे बाजार भावापेक्षा स्वस्त व स्वदेशी, स्थानिक रोजगार निर्मिती उत्पादन अशी `श्रीराम अगरबत्ती`ची ओळख राहील व आपल्याला चांगला रोजगार निर्माण होईल.उत्पादनाच्या प्रतवारी विषयी पूर्ण काळजी घेतली जाईल.ग्राहकाचे समाधान हेच आपले समाधान हाच दृष्टिकोन हा उपक्रम राबवितांना प्रामुख्याने असेल.उदघाटक शशिकांत कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शपर भाषणात म्हणाले, राबवित असलेल्या उपक्रमाचे व डोंबिवली पश्चिम मंडलाचे कौतुक केले. खूपच स्तूत्य असा उपक्रम असून योग्य वेळी सुरुवात झाली हे खूप महत्वाचे झाले. सामान्य नागरिकांना उपजीविकेच्या खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अश्या वेळी आपल्या एकजुटीचा व नेतृत्व गुणांचा फायदा हा कार्यकर्त्यांना होत आहे.या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटत आहे.
महिला बचतगटांना `श्रीराम अगरबत्ती` या व्यवसायाची एक चांगली संधी भाजपाने निर्माण करून दिली आहे. या संधीचा गरजू व महिला बचत गटांनी फायदा घ्यावा, उत्पादन विक्री जोमाने करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी ,त्यातूनच आपणास अपेक्षित अर्थजन निर्माण करता येईल व आपल्या आर्थिक गरजा भागविण्यास आपण सक्षमपणे परिवाराच्या उपजीविकेत नक्कीच हातभार लावणार आहात .शेवटी उपक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
महिला मोर्चा अध्यक्षा तथा नगरसेविका विद्या म्हात्रे ,बचत गट प्रमुख व सरचिटणीस रुचिता चव्हाण महिला मोर्चा पदाधिकारी मंडल पदाधिकारी ,उत्तर भारतीय आघाडी संयोजक श्री सुनीलजी शुक्ला गुजराथी आघाडी संयोजक जयेश बारोट ,युवा सरचिटणीस कृष्णकांत परुळेकर, मीडिया संयोजक हर्षद सुर्वे व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी मंडल उपाध्यक्ष अमोल दामले यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. श्रीराम अगरबत्ती उत्पादन विक्री साठी संपर्क क्र९८२१७३९५३१.

Post a Comment