Header AD

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वर्षावास सांगता समारोह संपन्न व भोजनदान व भंतेना चिवरदान


बुद्ध विहार तोडून आंबेडकर भवन बनवण्यास माजी आमदार राम पंडागळे व स्थानिकांसह रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध..


मुंबई  | प्रतिनिधी  : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार दामू नगर कांदिवली पूर्व या ठिकाणी वर्षावास सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी 10 वाजता पंचरंगी ध्वजरोहन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. संध्याकाळी 7 वाजता बुद्ध वंदना घेवून विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.यावेळी माजी आमदार राम पंडागळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला नालंदा बुद्ध विहार या जागी राहिली पाहिजे त्याजागी कुठलाही प्रकल्प नको. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मागाठणे महासचिव व पत्रकार संजय बोर्डे यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला. या विषयावर 2014 पासून पत्रव्यवहार केला आहे.भंते काश्यप यांना चीवर दान करण्यात आले. परिसरातील सर्व लोकांना भोजन दान करण्यात आले . यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव चवान,बंडू जाधव मामा, बापुराव चवान ,मच्छिद्र डावरे नागोराव रंजवे,  तात्याराम तांबारे, नगरसेविका प्रीतम पंडागळे, महिला नेत्या, सुनंदा बोर्डे ,गौतम पंडागळे सयाजी उघडे सुमन उघडे शिवराम काळे किसन हिवाळे, वसंत बनसोडे सुनील कांबळे राहुल ढगे व पत्रकार व रीपाई नेते संजय बोर्डे , परसराम पारखे सुदामती खोपे, रंजना पारखे अर्जुन बोबडे.बबन खरात लक्षणं रेड्डी भीमराव पैठणे विजय लांडगे मचिंद्र हिवाळे बाळासाहेब सिरसाठ सुरेश साळवे योगेश सोनावणे ऋषिकेश बोर्डे वृषाली बोर्डे रूपाली बोर्डे कैलास म्हस्के आनंद चित्तेकर, अभय पवार उदय पडेलकर सुभाष हळेमनी यांच्यासह शेकडो उपासक उपासिका उपस्थित होते.


धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वर्षावास सांगता समारोह संपन्न व भोजनदान व भंतेना चिवरदान धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वर्षावास सांगता समारोह संपन्न व भोजनदान व भंतेना चिवरदान Reviewed by News1 Marathi on October 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads