Header AD

रिपब्लिकन पक्षात गुजराती भाषिक आघाडी ची स्थापना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेसमाजसेवक जयंतीभाई  वेलजी गडा यांची  रिपाइं  च्या मुंबई प्रदेश गुजराती आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती...


मुंबई  |  प्रतिनिधी  :  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 63वा वर्धापन दिन दि. 3 ऑक्टोबर ला देशभर साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षात गुजराती भाषिक आघाडी ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली. त्यानुसार आज रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश गुजराती भाषिक आघाडीच्या  अध्यक्ष पदी अंधेरीतील समाजसेवक आणि मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री . जयंतीभाई वेलजी गडा यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परोषदेत केली. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी  मंत्री अविनाश महातेकर ;राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ; एम एस नंदा  तसेच गुजराती भाषिक आघाडी चे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष  जयंतीभाई वेलजी गडा उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश गुजराती आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झालेले जयंतीभाई वेलजी गडा हे मुंबई च्या अंधेरी विभागात लोकप्रिय समाजसेवक आहेत.मुंबईतील गुजराती भाषिकांना संघटित करणारे;गुजराती व्यापारी संघटनांमध्ये कार्यरत असणारे  जयंतीभाई गडा हे गरीब गरजूंना औषधं ; रेशन ची मदत करीत असतात. केंद्रियराज्यमंत्री रामदास  आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष सर्व समाजाच्या सर्व भाषिक सर्व प्रांतीय लोकांना सोबत घेणारे असणारे त्यांच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवून जयंतीभाई गडा यांनी रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश केला .
रिपब्लिकन पक्षात गुजराती भाषिक आघाडी ची स्थापना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पक्षात गुजराती भाषिक आघाडी ची स्थापना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads