Header AD

आता कार्यालयीन वेळेतही बदल करण्याची महिलांची मागणी

     डोंबिवली | शंकर जाधव : अनलाॅकमध्ये दैनदिन जीवन पूर्वपदावर येत असताना महिलांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पंरतु रेल्वे प्रवास करताना ठरवलेली वेळ आहे त्याचा विचार करून कार्यालयीन वेळेतहि बदल करावा अशी मागणी महिला प्रवाश्यांकडून केली जात आहे. कार्यालयीन वेळेत पोहोचता येत नसल्याने `लेट मार्क`मिळण्याची शक्यता आहे अशी चिंता काही महिलांनी व्यक्त केले आहे.  खासदार रेल्वे समन्वय समितीच्या सदस्या स्वाती मोहिते म्हणाल्या, कोरोनाचे संकट असूनही असले तरी आपल्या जीवनाची गाडी चालू राहण्यासाठी जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सुरु झाली याला महत्व आहे. रेल्वे प्रवासात थोडी सवलत मिळाली असली तरी महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या निर्णयाचे स्वागत असून थोड्या दिवसात प्रवासात आणखी मुभा मिळेल अशी अपेक्षा आहे. तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता हरगडे म्हणाल्यासर्व सामान्य महिलांना आता रेल्वेने प्रवास करता येणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक महिने घरातून बाहेर पडता येत नव्हतं.खाजगी कंपनीतहातावर पोट भरणाऱ्याघरकाम करणाऱ्या महिलांना आता त्यांची रोजीरोटीसाठी बाहेर पडता येणार आहे.या चांगल्या कार्याबद्दल राज्य शासन तसेच रेल्वेचे अभिनंदन करायला पाहिजे. तर भाजप नगरसेविका मनीषा धात्रक म्हणाल्या,अजूनही कोरोचे संकट टळले नाही. तरी सरकारच्या नियमांचे पालन करून रेल्वे प्रवास करणे आवश्यक आहे.मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे महत्वाचे असल्याने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.शिवसेना कल्याण–डोंबिवली महानगर संघटकवैशाली दरेकर-राणे म्हणाल्यामहिलांना प्रवासासाठी लागणारा वेळत्यासाठी करावी लागणारी दमछाक या सगळ्यातून थोडीशी मूक्तता मिळेलसर्व महिला भगिनींचे अभिनंदनरेल्वेने प्रवास करा सर्व प्रकारची काळजी घ्या.कारण आपली जबाबदारी संपलेली नाहीकोरोना विरोधातला लढा अजूनही सुरू आहेसात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत केंद्र सरकारने ठराविक वेळेत महिलांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.या निर्णयामुळे महिला प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र सकाळी ११ ते दुपारी ४ आणि सायंकाळी ७ ते रात्री १२ अशी वेळ निश्चित करण्यात आल्याने कार्यालयीन वेळेतही बदल करा करण्याची आवश्यकता असल्याचे मत महिलांनी मांडले आहे.
आता कार्यालयीन वेळेतही बदल करण्याची महिलांची मागणी आता कार्यालयीन वेळेतही बदल करण्याची महिलांची मागणी Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads