Header AD

कोरोनामुळे विकासंकांच्या परवानगी फीचे पालिकेचे उत्पन्न घटले उत्पन्नात तब्बल ४३ कोटींची घट                                                                                             
कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कोरोना पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची विकासकांना देण्यात येणाऱ्या परवानग्यातुन फी स्वरूपात गत  वर्षी च्या तुलनेत मिळणाऱ्या अपेक्षित उत्पनात निम्याने घट झाल्याचे दिसत असल्याने कोरोना संकटाचा फटका मनपा उत्पन स्त्रोवर होत आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण पाहता विकासकांच्या माध्यमातून अनेक बिल्डिंग, गुहप्रकल्प उभे राहत असुन विकासकांना बिल्डिंग उभारताना पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या परवानगी  फी पोटी  कोट्यवधी रूपये मनपा तिजेरीत जमा होतात.  मनपा  उत्पन स्त्रोत असलेल्या विकासकांना देण्यात येणाऱ्या परवानगी बाबत मनपाने आँटो डीसीआर प्रणाली यंत्रणा सुरू करीत एक खिडकी योजना सुरू केली. १ एप्रिल २०२० ते ३०सप्टेंबर २०२० या कालावधीत मनपा क्षेत्रातील कल्याण ०९,  डोंबिवली ०४, २७ गावे०४, अशा एकुण १७ प्रारंभ परवानग्या, तसेच कल्याण २७, डोंबिवली १४, २७ गावे ०५   अशा एकुण ४६ सुधारित परवानग्या, तर कल्याण २३, डोंबिवली १९, २७ गावे ०३  एकुण ४५ वापर परवानगी विकासकांना देण्यात आल्या.


मागील वर्षी १ एप्रिल २०१९ ते ८ आँक्टोबर २०१९ पर्यंत नगररचना विभागामार्फत विकासकांना देण्यात आलेल्या परवानग्यातुन तब्बल ७९ कोटी ५२लाख ३५ हजार ६७५ रू फी पोटी मनपा फंडात आल्याने तिजोरीत भर पडली होती.  यंदा  १एप्रिल २०२० ते ८ आँक्टोबर २०२० पर्यंत विकासकांना देण्यात आलेल्या परवानग्यातुन फी पोटी ३६ कोटी २०लाख ३९हजार २४४ रू.मनपा तिजोरीत जमा झाल्याने गत वर्षी च्या तुलनेत यावर्षात ४३ कोटी ३१ लाख ९६ हजार ४३१ रू घट  अपेक्षित उत्पन्नात  दिसत असल्याने कोरोनामुळे पार्श्वभूमीचा चटका मनपा अपेक्षित उत्पन्न स्त्रोतवर होत असल्याचे दिसत आहे . याबाबत केडीएमसी नगररचनाकार मारूती राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार  आँटो डी सी आर प्रणाली अंतर्गत विकासकांना परवानगी बाबत एक खिडकी योजनेतून जलदगतीने निपटरा करीत परवानगी प्रक्रिया केली जाते. विकासकांनी परवानगी फी लवकरात लवकर भरीत प्रशासनाला सहकार्य करावे."


काही  विकासक घरे घेण्यासाठी रजिस्ट्रेशन फी बुकिंग फी मध्ये सवलत देत घरे विकत घेण्यासाठी ग्राहकवर्गासाठी जाहिरात करीत आहेत. परंतु  काही आतिश्रीमंत  ग्राहकवर्गाचा अपवाद वगळता  कोरोना संकट काळात लाँकडाऊनमुळे येत्या दोन चार वर्षाचे शिल्लकी गणिताचे बजेट कोलमडल्याने इच्छा असुन देखील    माध्यवर्गीय ग्राहक घरे घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे चित्र कोरोना पार्श्वभूमीवर दिसत आहे. क्रेडाई एमसीएचआय अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोवीड धर्तीवर शासनाने एक धोरण आवलंबिलेले आहे. यानुसार  क्रेडाई एमसीएचआय निवेदन देत विकासकांना फी भरण्याबाबत सुलभ हफ्त्यात सवलत द्यावी याबाबत स्थायी समितीने मंजुरी दिली असुन दोन वर्षाच्या कालावधीत विकासकांना तीन टप्प्यात डेव्हलपमेंट चार्जेस आदी भरणेबाबत सवलत मिळणार आहे. तसेच घरे घेणाऱ्या ग्राहकासाठी १५ दिवसानंतर आँनलाईन प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे.

कोरोनामुळे विकासंकांच्या परवानगी फीचे पालिकेचे उत्पन्न घटले उत्पन्नात तब्बल ४३ कोटींची घट कोरोनामुळे विकासंकांच्या परवानगी फीचे पालिकेचे उत्पन्न घटले    उत्पन्नात तब्बल ४३ कोटींची घट   Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads