Header AD

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सुटणार

ठाणे  | प्रतिनिधी  :-  ठाणे लोकसभा क्षेत्रामधील मीरा भाईंदर येथे १२ लाख पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेस गेले काही महिन्यापासून महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर कोटयानुसार पाणी पुरवठा न होता अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने मिरा भाईंदर शहरामधील पाणी पुरवठयाच्या तक्रारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. याबाबत खासदार राजन विचारे यांनी उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई साहेबांना निवेदन दिले यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर निर्माण झालेल्या अतिरिक्त् पाण्याचे, बिगर सिंचन पाणी आरक्षण, शासन निर्णय दि. 26/09/2018 अन्वये करण्यात आले आहे. 


सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळास 87.95  दलघमी (321 द.ल.ली./दिन) इतके वाढीव पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. सदर मंजूर केलेल्या कोटयामध्ये मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण विभाग यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेस 85 द.ल.ली./दिन पाणी वाटप केलेले आहे. यापूर्वी महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाने 50 द.ल.ली. पाणी मंजूर केलेले आहे. मा. कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी जुलै 2019 मध्ये बारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा निर्माण झाल्यानंतर मिरा भाईंदर शहरास मंजूर पाणी पुरवठा करावा व तोपर्यंत पावसाळयाच्या कालावधीत 25 द.ल.ली. पाणी वाढविण्यात यावे. असे निर्देश दिलेले होते. त्यानुसार मिरा भाईंदर शहरास 25 द.ल.ली. पाणी वाढवून सुमारे 115 द.ल.ली. इतके पाणी शहरास पुरवठा करण्यात येत होते. 


मात्र त्यानंतर मार्च 2020 मध्ये मुख्य् कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळ यांनी पत्र देऊन सदरचे वाढविण्यात आलेले 25 द.ल.ली. पाणी बंद करण्यात येत आहे, असे कळविलेले आहे. त्यामुळे शहरास सद्या फक्त् 90 द.ल.ली. इतका पाणी पुरवठा होत होता.  परंतु मागील वर्षापासून बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे मिरा भाईंदर शहरास मंजूर कोटयानुसार पूर्ण 125 द.ल.ली. पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र आजमितीस केवळ 90 द.ल.ली. इतकेच पाणी मिळत आहे. म्हणजेच मंजूर कोटयापेक्षा सुमारे 35 द.ल.ली. कमी पाणी मिळत आहे.


दोन दिवसापूर्वी मंत्री महोदयांनी आणखी १० द. ल. ली. पाणी मीरा भाईंदर शहराला दिले आहे अशी माहिती दिली. तसेच उर्वरित २५ द. ल. ली. पाणी प्रश्न सोडविण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची तात्काळ बैठक बोलवून यावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. व मिरा भाईंदर महानगरपालिकेस मंजूर कोटयानुसार 125 द.ल.ली.पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात येईल. अशी हमी मंत्री महोदयांनी दिली.


खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सुटणार खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सुटणार Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads