Header AD

टीसीएलने वायरलेस सबवूफरसह साउंडबार लॉन्च केला

या लॉन्चसह ब्रँडचा ऑडिओ सेगमेंटमध्ये प्रवेश... 


 

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२० : ग्राहकांसाठी अद्वितीय इलेक्ट्रॉनिक उत्पादने वितरित करण्याच्या दृष्टीकोनातून आणि उत्तम आवाजाच्या अनुभवाची ग्राहकांची मागणी समजून घेत टीसीएलने वायरलेस सबवुफरसह २.१ चॅनल होम थिएटर साउंडबार ‘टीसीएल टीएस ३०१५’ लाँच केला आहे. या लाँचच्या माध्यमातून, ब्रँडने ऑडिओ सेगमेंटमध्ये प्रवेश केला असून सध्याच्या स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आणि एअर कंडिशनर्सच्या पोर्टफोलिओत एक नवी उत्पादन श्रेणी जोडली आहे.


 

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या सुरु असलेल्या टी-२० मालिकेदरम्यान, ब्रँड ग्राहकांना स्टेडिअमसारखी ऑडिओ मेजवानी प्रदान करत असून हे उत्पादन हॉट सेलिंग क्यूएलईडी आणि यूएचडी टीव्हीसाठी पूरक आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ८,९९९ रुपयांत हे साउंडबार उपलब्ध आहेत.  


 

टीसीएल टीएस ३०१५ मध्ये १८० व्हॉट्सपर्यंत परिपूर्ण ट्यून केलेले आणि डायनॅमिक ऑडिओ आउटपपूट असून यूझरचा ऐकण्याचा अनुभव वाढवण्याकरिता हे खास डिझाइन केले आहे. यासोबत वायरलेस सबवुफर येत असून याद्वारे डीप बास इम्पॅक्टची सुविधा मिळते. तसेच यूझर्सना घरी राहूनच उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव प्रदान केला जातो. यासोबत स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही ब्लूटूथ असलेल्या उपकरणासोबत वायरलेसरित्या संगीत स्ट्रीम करण्याची सुविधा अत्याधुनिक ब्लूटूथ ५.० द्वारे दिली जाते.


 

हा साउंडबार सेट अप करण्याची प्रक्रिया यूझर-फ्रेंडली असून वायरलेस सबवुफर ऑफरद्वारे उच्च प्लेसमेंट फ्लेक्झिबिलीटी दिली जाते. याचे डिझाइन साधे पण स्टायलिश असल्याने यूझर्स याला सहजपणे टीव्हीच्या बाजूला ठेवू शकतात किंवा भिंतीवरही लावू शकतात. एचडीएमआय पोर्ट, ऑप्टिकल, एयूएक्स लाइन-इन किंवा आरसीए कनेक्शनद्वारे टीव्हीला साउंडबार कनेक्ट करता येऊ शकतात. तसेच संगीत किंवा बातम्या ऐकणे किंवा चित्रपट पाहण्यासाठी यात वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स उपलब्ध आहेत.


 

टीसीएल इंडियाचे वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर निजयकुमार मिकीलेनेनी म्हणाले, “संगीत शौकिन तसेच मनोरंजन क्षेत्रातील सध्यातील मागण्या सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे दर्जेदार आणि कोणत्याही स्मार्ट डिव्हाइससोबत सहज कनेक्ट होऊ शकणा-या उत्तम प्रकारच्या संगीत प्रणालीच्या शोधात यूझर्स नेहमीच असतात. याच दृष्टीकोनातून टीसीएल टीएस ३०१५ तयार केले असून संगीत शौकिनांना सध्याच्या आधुनिक स्पीकर्सकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या सुविधा याद्वारे प्रदान करण्याचा प्रयत्न आहे."टीसीएलने वायरलेस सबवूफरसह साउंडबार लॉन्च केला टीसीएलने वायरलेस सबवूफरसह साउंडबार लॉन्च केला Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads