Header AD

हर्ष महेश्‍वरी, श्रीपद सरमा कत्रापती, आर्यन छाब्रा व लक्ष्‍मी राजाराम ठरले देशातील सर्वोत्तम क्‍यूब सॉल्‍व्‍हर्स


■आता ‘रेड बुल रुबिक्‍स क्‍यूब वर्ल्‍ड कप’ वर्ल्‍ड फायनल्‍स मधील १५ देशांमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व करणार पहिल्‍यांदाच वर्ल्‍ड फायनल्‍स डिजिटल क्‍यूब्‍स स्‍वरूपामध्‍ये खेळवण्‍यात येणार भारतातील नोंदणी केलेल्‍या ५५० हून अधिक व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या घरांमधूनच पात्रता फे-यांसाठी एकमेकांविरूद्ध ऑनलाइन स्‍पर्धा केली.....


भारत, ३० ऑक्‍टोबर २०२० :  रेड बुल रूबिक्‍स वर्ल्‍ड कपच्‍या तिस-या पर्वाच्‍या नॅशनल फायनल्‍समध्‍ये देशभरातील सर्वोत्तम क्‍यूब सॉल्‍व्‍हर्स त्‍यांच्‍या घरांमधूनच एकमेकांविरूद्ध ऑनलाइन स्‍पर्धा करताना दिसण्‍यात आले. १८ ऑक्‍टोबर रोजी भारतातील ऑनलाइन पात्रता फे-यांमध्‍ये भारतभरातील ५५०हून अधिक क्‍यूब सोडवणा-या प्रतिभावान स्‍पर्धकांचा सहभाग दिसण्‍यात आला. या पात्रता फे-यांमध्‍ये फास्‍टेस्‍ट हँड, रि-स्‍क्रॅम्‍बल व स्‍पीड क्‍यूबिंग (मिक्‍स्‍ड)मधील ८ स्‍पर्धक, तसेच सर्वोत्तम टाइमिंग्‍जसह स्‍पीड क्‍यूबिंग (फिमेल)मधील ६ स्‍पर्धक पात्र ठरले आणि त्‍यांनी २५ ऑक्‍टोबर रोजी त्‍यांच्‍या घरांमधून १व्‍ही१ स्‍वरूपात ऑनलाइन नॅशनल फायनल्‍समध्‍ये स्‍पर्धा केली.


फायनल्‍समध्‍ये आर्यन छाब्रा (नवी दिल्‍ली), लक्ष्‍मी राजाराम (चेन्‍नई), हर्ष महेश्‍वरी (मुंबई) आणि श्रीपद सरमा कत्रापती (कोलकाता) यांनी त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये, म्‍हणजेच स्‍पीड क्‍यूबिंग (मिक्‍स्‍ड), स्‍पीड क्‍यूबिंग (फिमेल), रि-स्‍क्रॅम्‍बल व फास्‍टेस्‍ट हँड या विभागांमध्‍ये त्‍यांच्‍या प्रतिस्‍पर्धींवर मात करत विजय मिळवला. आता त्‍यांना त्‍यांच्‍या घरांमधूनच वन-ऑन-वन नॉक टूर्नामेण्‍ट ऑनलाइन स्‍वरूपात ६ व ७ नोव्‍हेंबर रोजी रेड बुल रूबिक्‍स क्‍यूब वर्ल्‍ड कप फायनल्‍स २०२० मध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळेल. पहिल्‍यांदाच वर्ल्‍ड फायनल्‍स डिजिटल क्‍यूब्‍स स्‍वरूपामध्‍ये खेळवण्‍यात येणार आहे.  


रेड बुल रूबिक्‍स क्‍यूब वर्ल्‍ड कपचा क्‍यूबिंग समुदायासाठी अधिक संधी व स्‍पष्‍टता विकसित करण्‍याचा मनसुबा आहे. त्‍यांचा स्‍पीड क्‍यूबिंगला प्रोफेशनल माइण्‍ड स्‍पोर्ट म्‍हणून विकसित करण्‍याचा आणि क्‍यूबिंग अॅथलीट्सना नवीन स्‍वरूपांमध्‍ये स्‍पर्धा करण्‍याची संधी देण्‍याचा उद्देश आहे. जगभरातील १५ देशांमधील ३० स्‍पर्धक ३०,००० अमेरिकन डॉलर्सचे एकूण बक्षीस व जागति‍क किताब जिंकण्‍यासाठी एकमेकांशी स्‍पर्धा करतील.

रेड बुल रूबिक्‍स क्‍यूब वर्ल्‍ड कप २०२० इंडियाचे विजेते:

स्‍पीड क्‍यूबिंग मिक्‍स्‍ड: आर्यन छाब्रा (नवी दिल्‍ली)

स्‍पीड क्‍यूबिंग फिमेल: लक्ष्‍मी राजाराम (चेन्‍नई)

फास्‍टेस्‍ट हँड: श्रीपद सरमा कत्रापती (कोलकाता)

रि-स्‍क्रॅम्‍बल: हर्ष महेश्‍वरी (मुंबई)


मुंबईचा हर्ष महेश्‍वरी रेड बुल रूबिक्‍स क्‍यूब वर्ल्‍ड कपच्‍या वर्ल्‍ड फायनल्‍समधील रि-स्‍क्रॅम्‍बल विभागामध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व करण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. तो म्‍हणाला, ''मला नॅशनल फायनल जिंकण्‍याचा खूप आनंद झाला आहे. हे यश आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा मला खूप अभिमान वाटतो. मी डिजिटल क्‍यूब्‍ससह रि-स्‍क्रॅम्‍बल विभागामध्‍ये भारताचे प्रति‍निधित्‍व करण्‍यासाठी हे व्‍यासपीठ देण्‍यासाठी रेड बुलचे आभार मानतो.


हर्ष महेश्‍वरी, श्रीपद सरमा कत्रापती, आर्यन छाब्रा व लक्ष्‍मी राजाराम ठरले देशातील सर्वोत्तम क्‍यूब सॉल्‍व्‍हर्स हर्ष महेश्‍वरी, श्रीपद सरमा कत्रापती, आर्यन छाब्रा व लक्ष्‍मी राजाराम ठरले देशातील सर्वोत्तम क्‍यूब सॉल्‍व्‍हर्स Reviewed by News1 Marathi on October 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads